भातलागवड हंगामात ८ तासांचा वीजपुरवठा

राज्याची स्वतःची वीज निर्मिती, देवाण-घेवाण करार आणि अतिरिक्त खरेदी कराराच्या माध्यमातून खरिपात भातलागवडीच्या हंगामासाठी विजेची गरज भागवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे ऊर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पी.के.दास यांनी सांगितले आहे.
भातलागवड हंगामात ८ तासांचा वीजपुरवठा
Power SupplyAgrowon

हरियाणा सरकारने बुधवारपासून (तारीख १५ जून) सुरु झालेल्या खरीपातील भात लागवडीच्या (Paddy Season) हंगामात ८ तास वीज पुरवण्याची ग्वाही शेतकऱ्यांना दिली आहे.

शेतकऱ्यांना भातपिकाऐवजी अन्य पिकांच्या लागवडीकडे आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जाताहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 'मेरा पाणी मेरी विरासत' अभियान राबवण्यात आले आहे. या अभियाना अंतर्गत १९,५०० शेतकऱ्यांनी खरीपात भातपिकाऐवजी इतर पीक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हरियाणातील वीज वितरण कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.

Power Supply
रेशीम उत्पादनांची निर्यात रुळावर

राज्य सरकारच्या माहितीनुसार राज्यातील वीज वितरण कंपन्यांनी संपूर्ण कृषी क्षेत्राचे तीन विभागात वर्गीकरण केले आहे. पहिल्या विभागाला रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत वीज पुरवली जाणार आहे. दुसऱ्या विभागाला पहाटे ४ ते दुपारी १२ वाजेपर्यंत वीज पुरवली जाणार आहे. तिसऱ्या विभागात सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत वीज पुरवल्या जाणार आहे.

राज्याची स्वतःची वीज निर्मिती, देवाण-घेवाण करार आणि अतिरिक्त खरेदी कराराच्या माध्यमातून खरिपात भातलागवडीच्या हंगामासाठी विजेची गरज भागवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे ऊर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पी.के.दास यांनी सांगितले आहे. ८ तास वीज पुरवठ्याशिवाय राज्याच्या ग्रामीण भागात रात्री सलग वीज पुरवठा करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे दास म्हणालेत. त्यासाठी उद्योग क्षेत्रातील वीज पुरवठ्याच्या वेळापत्रकात कसलाही बदल करणार नसल्याचे दास यांनी सांगितले.

दरम्यान राज्य सरकारने खरीपाच्या भात लागवगडीच्या हंगामात १२ हजार मेगावॅटहुन अधिक वीज पुरवठ्याची व्यवस्था केली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वीज उपलब्ध करून देण्याची हमी सरकारकडून देण्यात आली आहे.

सध्या तरी राज्याकडे पुरेशा प्रमाणात कोळशाचा साठा उपलब्ध आहे. यमुनानगर, जझर, हिस्सार येथील वीज निर्मिती केंद्रांकडून सुरळीत पुरवठा होत असल्यामुळे भातपिकाच्या लागवडीच्या हंगामात वीज कमी पडणार नसल्याचेही दास म्हणालेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com