Health Facilities : नर्मदेकाठाच्या गावांना स्पीडबोटच्या सहाय्याने आरोग्य सुविधा

प्रत्येक शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांच्या फेस रीडिंगद्वारे हजेरीचा राज्यातील आगळावेगळा उपक्रम आपण जिल्ह्यात राबविणार असल्याचीही माहिती या वेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिली.
Boat
BoatAgrowon

Nandurbar Health Facilities News : नंदुरबार जिल्हा केंद्र सरकारने (Central Government) आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केला असून, आदिवासी दुर्गम (Tribal Remote Area) भागात प्रतिकूल परिस्थितीत आरोग्यसेवा पुरविणाऱ्या डॉक्टर व आरोग्यकर्मींच्या वेतनात वाढ करण्यात येणार आहे.

तसेच तरंगत्या दवाखान्यांच्या जागेवर लवकरच स्पीडबोटच्या मदतीने नर्मदा नदीकाठावरील गावांना आरोग्यसेवा दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijayakumar Gavit) यांनी दिली.

शहादा (जि.नंदुरबार) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या (Rural Hospital) उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोळे, पंचायत समितीचे सभापती वीरसिंग ठाकरे, जिल्हा परिषद सदस्या जिजाताई ठाकरे, के. डी. नाईक, गुलाब ठाकरे, राजीव जाधव, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतिलाल टाटिया, ईश्वर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता महेश पाटील, डॉ. राजेश वसावे, डॉ. गोविंद शेल्टे व नागरिक उपस्थित होते.

Boat
आरोग्य सुविधा आणखी बळकट करण्यावर भर ः मुख्यमंत्री ठाकरे

या वेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, की जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी येत्या दोन वर्षांत दोनशेपेक्षा अधिक आरोग्य उपकेंद्रे, ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ११ ग्रामीण रुग्णालयांची निर्मिती व टाटा इन्स्टिट्यूटच्या मदतीने नर्मदा नदीकाठावरील गावांनी स्पीडबोटीच्या मदतीने आरोग्य सुविधा सुरू केली जाणार आहे.

प्रत्येक कार्यालयात फेस रीडिंगद्वारे हजेरी

पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, की आदिवासी दुर्गम भागात कनेक्टिव्हिटी वाढविण्यासोबतच या भागातील नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांची हजेरी वेळेत असणे गरजेचे आहे.

त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांच्या फेस रीडिंगद्वारे हजेरीचा राज्यातील आगळावेगळा उपक्रम आपण जिल्ह्यात राबविणार असल्याचीही माहिती या वेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com