Healthy Neera : आरोग्यदायी नीरेचे फायदे

नीरा हे चवीला गोड व कमी उष्मांक असलेले पेय आहे. कमी ग्लासमिक इंडेक्स असल्यामुळे मधुमेहासारख्या जीवनशैलीशी निगडित आजारांवर सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
Healthy Neera
Healthy NeeraAgrowon

अनुप्रीता जोशी

Healthy Neera : नीरा हे चवीला गोड व कमी उष्मांक असलेले पेय (Summer Drink) आहे. कमी ग्लासमिक इंडेक्स असल्यामुळे मधुमेहासारख्या जीवनशैलीशी निगडित आजारांवर सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. नीराच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी देखील मदत होते.

१) खनिजे आणि जीवनसत्त्वांच्या मुबलक प्रमाणामुळे चयापचय आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत.

२) पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, झिंक, लोह, जीवनसत्त्व ब आणि जीवनसत्त्व क भरपूर प्रमाणात उपलब्ध.

३) जीवनसत्त्व ब१ आणि पोटॅशिअम उच्च रक्तदाब कमी करण्यास, कोलेस्टेरॉलची पातळी आणि वजन नियंत्रित करण्यास मदत.

४) फॉस्फरसचे प्रमाण हाडे मजबूत करणे, पेशींची वाढ आणि मूत्रपिंडाचे आरोग्य सुधारण्यास उपयोगी.

५) सोडिअमचे प्रमाण शरीरातील आरोग्यदायी क्षारांचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी उपयुक्त.

Healthy Neera
Water Shortage : नीरा खोऱ्यातील पाणीसाठ्यात दहा टक्क्यांनी घट

६) क्लोरीनचे प्रमाण शरीरातील द्रव पदार्थांचे प्रमाण आणि पीएच संतुलित राखण्यास मदत.

७) झिंक शरीरातील मज्जातंतूंची वाढ, बुद्धिमत्ता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर.

८) लोहाचे प्रमाण रक्ताची गुणवत्ता राखण्यासाठी आणि मानसिक विकासासाठी महत्त्वाची.

९) श्‍वसनाच्या आजारामध्ये फायदेशीर.

१०) ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेहीसाठी फायदेशीर.

११) शरीरामध्ये प्रथिने संश्‍लेषणासाठी आवश्यक ग्लुटामिक ॲसिडची उपलब्धता.

१२) सेवनाने केस, त्वचा तसेच नखांच्या आरोग्यामध्ये सुधारणा.

१३) अँटिऑक्सिडेंट घटकांचे प्रमाण शरीरातील मुक्तकण कमी करण्यासाठी मदत. यामुळे पेशींचे नुकसान थांबून वृद्धत्व येण्यास विलंब करतात.

१४) डीहायड्रेशनच्या त्रासापासून आराम मिळतो, शरीराला ऊर्जा मिळते. अधिकाधिक कॅलरीज मिळतात. परिणामी, उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. थकवा कमी होण्यास मदत.

नीरेपासून मूल्यवर्धित पदार्थ ः

गूळ, साखर, मध, पेय, चॉकलेट, ट्रॉफी, व्हिनेगार, सिरप, कुकीज, कॉन्सन्ट्रेटेड सिरप, स्वीटनर असे विविध खाद्यपदार्थ तयार करता येऊ शकतात.

गूळ ः

१) नीरा उच्च तापमानावर उकळून त्यातील पाण्याचा अंश बाष्पीभवन करून गूळ तयार केला जातो. नीरेपासून तयार केला जाणारा गूळ हा घन किंवा घनद्रवरूप मिश्रणामध्ये उपलब्ध असतो.

२) गुळाचा सामू ६.५ ते ७.५ असतो. उच्च तापमानाची प्रक्रिया केल्यामुळे रंग गडद तपकिरी असतो.

सिरप ः

१) नीरा मिश्रण उच्च तापमानाला गरम करून त्याचे रूपांतर घट्ट सिरप किंवा पाकामध्ये होते.

२) या पदार्थांमधून नीरेमधील बहुतांशी औषधी गुणधर्म व आवश्यक पोषक घटक मिळतात.

वाइन ः

१) नीराच्या मिश्रणाची नैसर्गिक यीस्ट वापरून आंबवण प्रक्रिया केल्यावर सफेद रंगाची वाइन तयार होते. यामध्ये चार टक्के अल्कोहोलचे प्रमाण असते.

२) जास्त वेळ आंबवण केल्यानंतर त्यातील आम्लाचे प्रमाण वाढून चव बदलते.

३) चव वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारांच्या मसाल्यांचा देखील वापर केला जातो.

मधनिर्मिती ः

१) नीरेपासून तयार करण्यात येणारा मध, मधमाशीपासून नैसर्गिकरीत्या मिळणाऱ्या मधासारखाच असतो. या मधाचा गोडवा ७८० डिग्री ब्रिक्स आणि सामू ६ ते ६.५ असतो.

२) मधाचा उपयोग विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करताना वापर केला जातो.

३) साखरेच्या तुलनेत नीरेपासून तयार होणाऱ्या मधामध्ये अतिशय आरोग्यदायी पोषण तत्त्वे असतात.

४) लोह व जीवनसत्त्व क मुबलक प्रमाणात असल्यामुळे ॲनेमियाने आजारी रुग्णांसाठी फायदेशीर.

Healthy Neera
Nira Deoghar Dam : नीरा-देवघर प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत आंदोलन सुरू

साखरनिर्मिती ः

१) ताज्या जमा केलेल्या मिश्रणाला ११५ अंश सेल्सिअस तापमानावर गरम करून त्यापासून साखर तयार करता येते. नीरेपासून तयार करण्यात येणाऱ्या साखरेमध्ये कुठल्याही प्रकारचे रसायन नसल्यामुळे या साखरेचा नैसर्गिक गोडवा देणारे व भरपूर प्रमाणात पोषण तत्त्वे असणारी साखर म्हणून वापर केला जाऊ शकतो.

२) जास्त पोषक घटक व औषधी गुणधर्म असल्यामुळे या साखरेचा वापर दक्षिण पूर्व आशियायी देशांमध्ये स्वीटनर म्हणून करतात.

३) नीरेपासून तयार होणारी साखर हा उसापासून तयार होणाऱ्या विविध प्रकारची रसायने वापरून तयार करण्यात येणाऱ्या साखरेवर एक सर्वोत्तम पर्याय आहे.

संपर्क ः अनुप्रीता जोशी, ९६३७२४०४०६, (अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com