
पुणे : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारपासून (ता. १७) विदर्भात मुसळधार पावसाने दणका (Heavy Rain) दिला आहे. विदर्भात अतिवृष्टी (Heavy Rain In Vidarbh) झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. या पावसाने विदर्भातील पूरस्थिती कायम (Flood Condition Continue) असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी (ता. १८) सकाळपासूनच वऱ्हाडासह, कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात संततधार पावसाला सुरुवात झाली होती.
नागपूर विभागातील ३३ तालुक्यांत अतिवृष्टी झाल्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काहीशा विश्रांतीनंतर विदर्भातील पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती कायम असून तब्बल २५ मार्गांवरील वाहतूक बंद आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर २३४५ नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. मध्यप्रदेश मध्ये सुरू असलेल्या पावसाचा देखील परिणाम गडचिरोली येथील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्यामध्ये झाला आहे. शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी १७ गेट उघडण्यात आले असून त्यातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. परिणामी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
वऱ्हाडात संततधार पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. अकोला तालुक्यातील पातूर नंदापूर शिवारात सततच्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून पिके पाण्याखाली आली. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर आता पिकांच्या नुकसानीची शक्यता वाढणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. अकोला जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. बाळापूर तालुक्यातील महेश नदीवरील धरण ओव्हर फ्लो झाल्याने शहराला पुराच्या पाण्याचा वेढा बसला. पारस प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले.
तुफान पर्जन्यवृष्टीनंतर दोन दिवस खंड दिलेल्या पावसाने नांदेडमध्ये पुन्हा संततधार सुरू केली आहे. हा पाऊस जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत झाल्यामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. दोन दिवसापासून पावसाने उघडीत दिल्याने शेतकरी शेतात जमा झालेले पाणी बाहेर काढण्यात व्यस्त होते. तर अनेक शेतकरी तणनाशक फवारणीच्या कामाला लागले होते. अशावेळी रविवारी दुपारनंतर पावसाने सुरुवात केली. मध्यरात्री जोरदार झालेला पाऊस सोमवारी दुपारपर्यंत सुरुच होता. कोकण, मध्य महाराष्ट्रातही दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी (ता. १८) सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू झाला होता.
सोमवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :
कोकण :
माथेरान ५०, संगमेश्वर ४०, कणकवली, वाडा, लांजा, तळा, मुरूड, चिपळूण, सावंतवाडी प्रत्येकी ३०.
मध्य महाराष्ट्र :
महाबळेश्वर ७०, गगनबावडा ६०, पन्हाळा, राधानगरी, गारगोटी, यावल, इगतपुरी, सोलापूर, लोणावळा, पारोळा, शाहूवाडी, रावेर प्रत्येकी ३०.
मराठवाडा :
बिलोली, निलंगा प्रत्येकी ६०, मुदखेड, जळकोट, नांदेड, माहूर, देगलूर, किनवट, अर्धापूर प्रत्येकी ५०, कळमनुरी, अहमदपूर, हिंगणघाट, भोकर, लोहा, उमरी, धर्माबाद, मुखेड, औसा प्रत्येकी ४०, औंढा नागनाथ, पाथरी, हिंगोंली, नायगाव खैरगाव, परभणी, उदगीर, देवणी, वसमत, हादगाव, कंधार, चाकूर, गंगापूर, पालम, शिरूर अनंतपाळ, लातूर प्रत्येकी ३०.
विदर्भ
हिंगणघाट, समुद्रपूर प्रत्येकी १९०, गडचिरोली १६०, राळेगाव १५०, सावळी, वर्धा प्रत्येकी १४०, ऐटापल्ली, देसाईगंज, भामरागड, देवळी, भिवापूर, कळंब, सेलू, चिमूर, लाखंदूर प्रत्येकी १३०, चामोर्शी १२०, धानेरी, आरमोरी, पवनी प्रत्येकी ११०, कुरखेडा, बाभुळगाव, नेर, उमरेड, मूल प्रत्येकी १००, ब्रम्हपूरी, सिंदेवाही, आर्वी प्रत्येकी ९०, चिखलदरा, पोभुर्णा, धारणी, कोर्ची, मुलचेरा, नागभिड, कुही, वरोरा, चांदूरबाजार, अहिरी, संग्रामपूर, धामणगाव रेल्वे प्रत्येकी ८०, चांदूर रेल्वे, यवतमाळ, खारंघा, रामटेक, नांदगाव काझी, कामठी, मोरगाव अर्जुनी, आष्टी, शेवगाव, हिंगणा, मोदा प्रत्येकी ७०, नागपूर, अमरावती, मोर्शी, बाळापूर, भंडारा, जळगाव जामोद प्रत्येकी ६०, भद्रावती, पातूर, बल्लारपूर, परतवाडा, देवरी, पारशिवणी, महागाव, घाटंजी, मोहाडी, खामगाव, कळमेश्वर, तिवसा, चंद्रपूर प्रत्येकी ५०.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.