
पुणे : मॉन्सून सक्रिय (Monsoon Active) असल्याने कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम (Rain Force In Upland And Konkan) आहे. दमदार पावसाने कोकणातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. तर घाटमाथ्यावरील पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर (Heavy Rainfall) धरल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ (Water Level) होऊ लागली आहे.
कोकणात मुसळधार सरींसह पावसाची संततधार सुरूच आहे. अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद होत अतिवृष्टी झाली आहे. सततच्या पावसाने रस्ते खचणे, दरडी कोसळण्याच्या घटना ही सुरूच जनजीवन विस्कळित झाले आहे. सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर रायगडमधील कुंडलिका, पाताळगंगा नद्या इशारा पातळीवरून वाहत आहे. काही भागात पावसाचा जोर कमी अधिक होत असला तरी सर्वच नद्या अद्यापही दुथडी भरून वाहत आहेत. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातही घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, नगर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर कोसळणाऱ्या पावसाने धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे. घाटमाथा वगळता उर्वरित भागात गुरुवारी दिवसभर ढगाळ हवामानासह पावसाची रिपरिप सुरू होती. मराठवाड्यात दुपारनंतर पावसाला सुरूवात झाली होती, मात्र पावसाचा जोर कमीच असल्याचे दिसून आले. तर विदर्भातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
गुरुवारी (ता.७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :
कोकण :
मुंबई शहर : कुलाबा १११, सांताक्रुझ १२५.
पालघर : पालघर ७४, वसई १४७, विक्रमगड ८६, वाडा १२१.
रायगड : अलिबाग ७४, कर्जत १६३, खालापूर १५२, महाड ९७, माणगाव १३४, माथेरान १७५, म्हसळा ७९, पनवेल १४९, पेण ११९, पोलादपूर १८३, रोहा १९७, श्रीवर्धन ८३, सुधागडपाली १२२, तळा १३३, उरण १२०.
रत्नागिरी : चिपळूण १०२, दापोली ११२, खेड १०७, मुलगुंद १२७, संगमेश्वर ७०, वाकवली ७०.
सिंधुदुर्ग : सावंतवाडी ६२.
ठाणे : अंबरनाथ १३४, भिवंडी ११८, कल्याण १०३, मुरबाड ५६, शहापूर १३५, ठाणे १२०, उल्हासनगर १२७.
मध्य महाराष्ट्र :
धुळे : धुळे ५७, शिरपूर ४६, सिंदखेडा ४७,
कोल्हापूर : आजरा ६०, चंदगड ५२, गगनबावडा ७५, गारगोटी ४५, पन्हाळा ४८, राधानगरी ९३, शाहूवाडी ५९.
नाशिक : इगतपुरी ९६, पेठ ५५.
पुणे : लोणावळा कृषी १४०, पौड ६१, वडगाव मावळ ४५, वेल्हे ७४,
सातारा : जावळीमेढा ४३, महाबळेश्वर १५४.
मराठवाडा :
हिंगोली : वसमत ४०.
नांदेड : अर्धापूर ५३, बिलोली ३०, धर्माबाद ४८, नायगाव खैरगाव ३५.
विदर्भ :
भंडारा : भंडारा ४३, साकोली ७४.
बुलडाणा : बुलडाणा ३८, नांदुरा ३६, शेगाव ३९.
चंद्रपूर : भद्रावती ४१.९, चिमूर ३५, वरोरा ४४.
गडचिरोली : भामरागड ४३.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.