Rain Updates: उत्तर कोकण, घाटमाथ्यावर पावसाचे थैमान

गुरुवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये घाटमाथ्यावरील शिरगाव येथे सर्वाधिक ३१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मराठवाड्यातही पावसाचे धुमशान (Heavy Rain) सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

पुणे : मॉन्सून (Monsoon) संततधार कोसळत असल्याने उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यासह धरणक्षेत्रात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. गुरुवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये घाटमाथ्यावरील शिरगाव येथे सर्वाधिक ३१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मराठवाड्यातही पावसाचे धुमशान (Heavy Rain) सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पूर्व विदर्भात देखील दमदार पाऊस सुरूच असल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे.

उत्तर कोकणातील (North Kokan) पालघर, जव्हार जिल्ह्यांसह मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची कोसळधार (Heavy Rain) सुरूच आहे. नद्या, नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत असून, अनेक ठिकाणी २०० मिलिमीटर पेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली आहे. या भागातील अनेक धरणे भरण्याच्या मार्गावर असून, लवकरच पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, पुणे, सातारा, जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर अधिक आहे.

मराठवाड्यातील (Marathawada) आठही जिल्ह्यांत गुरुवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाचे धुमशान सुरूच होते. तब्बल ५२ मंडलांत अतिवृष्टी झाली. मध्यम, दमदार, जोरदार ते अति जोरदार स्वरूपात बरसलेल्या या पावसाचा जोर नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, जिल्ह्यांत सर्वाधिक होता. नांदेड जिल्ह्यातील आठ व हिंगोली जिल्ह्यातील तीन तालुक्यांना तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

नांदेड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ (Heavy Rain) सुरूच आहे. यामुळे नद्यांना पूर येऊन खरिपातील पिके पाण्याखाली गेली आहेत. बुधवारी (ता. १३) दिवसभर पावसाचा जोर कायम होता. यामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांसह ३६ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. संततधार पावसामुळे सर्व प्रकल्पांतील पाणीपातळी वाढली आहे. तर विष्णुपुरी प्रकल्पाचे सात दरवाजे उघडून नदीत पाणी सोडण्यात येत आहे.

विदर्भातील (Vidarbha) चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम, यवतमाळ, भंडारा जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. संततधार पावसाने गडचिरोली जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील २१ मार्गावरील वाहतूक बंद असून, तीन हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पूर्व विदर्भातील इतरही जिल्ह्यात नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत.

गुरुवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग)

कोकण :

मुंबई शहर : सांताक्रूझ ९५.

पालघर : डहाणू २२५, जव्हार २३७, मोखाडा १६६, पालघर २२४, तलासरी २७५, विक्रमगड २५५, वाडा २४२,

रायगड : कर्जत १६४, खालापूर १३२, महाड १३४, माथेरान २४३, पनवेल १७०, पेण ९५, पोलादपूर १३३, रोहा ९६.

रत्नागिरी : लांजा १०७, मंडणगड ९५, संगमेश्‍वर ८०.

ठाणे : आंबरनाथ १३०, भिवंडी १०१, कल्याण १४०, मुरबाड ११७, शहापूर १४२, ठाणे १४८, उल्हासनगर १३२.

मध्य महाराष्ट्र :

जळगाव : रावेर ५८, यावल ८०.

कोल्हापूर : आजरा ५६, गगनबावडा ७४, गारगोटी ६०, पन्हाळा ५६, राधानगरी १२३, शाहूवाडी १११.

नंदूरबार : अक्कलकुवा ६६, नवापूर १०४.

नाशिक : हर्सूल १२८, इगतपुरी १६२, कळवण ६८, ओझरखेडा १३८, पेठ १८८, सटाणा १०२, सुरगाणा ६५, त्र्यंबकेश्वश्‍वर १२०.

पुणे : घोडेगाव ५३, भोर ५०, चिंचवड ६३, जुन्नर ६६, लोणावळा कृषी २३२, पौड ११०, पुणे ५४, वडगाव मावळ ७६, वेल्हे १३९.

सातारा : जावळीमेढा ९०, महाबळेश्‍वर २९४, पाटण ६२.

मराठवाडा :

औरंगाबाद : खुलताबाद ५१, पैठण ५३.

बीड : केज ६२.

हिंगोली : हिंगोली ६४, कळमनुरी १२४,

लातूर : लातूर ५२, निलंगा ६८, रेणापूर ५५.

नांदेड : अर्धापूर ८४, भोकर १५४, बिलोली ११०, धर्माबाद ८१, हदगाव १००, हिमायतनगर १२४, कंधार ६६, किनवट ६९, माहूर ६५, मुदखेड ८४, नायगाव खैरगाव ६६, नांदेड ६१, उमरी ६८

उस्मानाबाद : भूम ५०, कळंब ५४, उस्मानाबाद ६३.

परभणी : पाथरी ६२, पूर्णा ५०.

विदर्भ :

भंडारा : भंडारा ९०, लाखंदूर ६१.

चंद्रपूर : बल्लारपूर ७०, भद्रावती ५२, चंद्रपूर ७१, जेवती ८४, मूल ९४, सावळी ११२, सिंदेवाही ५९.

गडचिरोली : आरमोरी ६३, चामोर्शी ७७, गडचिरोली ११०, मुलचेरा ६१, सिरोंचा ७५.

वाशीम : मालेगाव ७१, मंगरूळपीर ५३, रिसोड ६१, वाशीम ७२.

यवतमाळ : आर्णी ६७, महागाव ६०, उमरेड ५९, वणी ५०.

  • - घाटमाथ्यासह, धरण क्षेत्रात तुफान पाऊस

  • - परभणी : निम्न दुधना प्रकल्पातून दुधना नदीत विसर्ग

  • - नांदेड : विष्णुपुरी धरणातून पाण्याचा विसर्ग

  • - नाशिक : दारणा, कडवा, गंगापूर पाणी सोडले

  • - गिरणा धरणातून लवकरच पाणी सोडणार

  • - सोलापूर : उजनी धरणाच्या साठ्यात वेगाने वाढ

  • - पुणे : खडकवासला, येडगाव पाण्याचा विसर्ग

  • - वाशीम जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद

  • - गडचिरोलीत संततधार पावसाने हाहाकार

  • - मराठवाड्यात मध्यम ते दमदार पाऊस

२०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे :

कोकण :

तलासरी २७५, डहाणू २२५, जव्हार २३७, पालघर २२४, विक्रमगड २५५, वाडा २४२ (जि. पालघर). माथेरान २४३ (जि. रायगड),

मध्य महाराष्ट्र :

महाबळेश्‍वर २९४ (जि. सातारा), लोणावळा कृषी २३२ (जि. पुणे).

घाटमाथा :

शिरगाव ३१०, दावडी २६०, खंद २५०, लोणावळा २४०, ताम्हिणी, अंबोणे प्रत्येकी २३०, डुंगरवाडी २१, भिवापुरी २००.

मुंबईला पाणी पुरविणारे तलाव :

वैतरणा २४०, तानसा २२०, भातसा २००.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com