Heavy Rain: अकोले तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग

जिल्ह्यातील बहुतांश भागांत तीन दिवसांपासून पाऊस (Rain) सुरु आहे. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात मुळा व भंडारदरा धरणाच्या पाणलोटात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे भंडारदरा धरणात पाण्याची आवक सुरु आहे.
Weather Updates
Weather UpdatesAgrowon

नगर : भंडारदरा, मुळा पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस (Heavy Rains) सुरू आहे. कृष्णावंती नदीवरील वाकी तलाव शनिवारी (ता.९) पूर्ण क्षमतेने भरला. हा प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने निळवंडे जलाशयाकडे पाणी झेपावले आहे. तालुक्यातील पाणनई, रतनवाडी, पांजरे, घाटघर भागात जोरदार पाऊस सुरु आहे. आज सकाळपर्यंत घाटघर, रतनवाडीला नऊ इंच, तर भंडारदरा येथे आठ इंच पाऊस झाला.

जिल्ह्याच्या अन्य भागातही शनिवारी संततधार सुरु होती. नाशिक भागात जोरदार पावसामुळे नांदूर मधमेश्वर येथील बंधाऱ्यातून रविवारी (ता.१०) सकाळी ६ हजार ३१० क्यूसेकने, तर सिद्धटेक येथे भीमा नदीतून २२ हजार ७६० क्युसेकने विसर्ग सुरु आहे. त्यामुळे भीमा व गोदावरी नदीकाठच्या नगर जिल्ह्यातील गावांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील बहुतांश भागांत तीन दिवसांपासून पाऊस (Rain) सुरु आहे. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात मुळा व भंडारदरा धरणाच्या पाणलोटात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे भंडारदरा धरणात पाण्याची आवक सुरु आहे. घाटघर, रतनवाडी, साम्रद, पांजरे, शिंगणवाडी आदी दहा गावांचा संपर्क तुटला आहे. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे थांबविली आहेत. भातखाचरे भरली आहेत. शेतकरी पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत.

...असा झाला पाऊस

- घाटघरला नऊ इंच (२३० मिलिमीटर)

- रतनवाडीला नऊ इंच (२२९ मिलिमीटर)

- वाकी येथे १०७, भंडारदरा येथे आठ इंच (२०९ मिलिमीटर)

- निळवंडे येथे १२९, कोतूळला ४० मिलिमीटर

- अकोल्यात ४१ मिलिमीटर

‘मुळा’त नऊ हजार क्युसेकने आवक

हरिचंद्रगड व अन्य पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस (Heavy Rain)सुरु आहे. त्यामुळे मुळा नदीतून कोतूळजवळ ९ हजार १५५ क्युसेकने आवक सुरु होती. मुळा धरणात अर्धा टीएमसी, तर भंडारदऱ्यात अडीच टीएमसी पाणी आले आहे. पाऊस असाच सुरु राहिला तर यंदाही भंडारदरा १५ ऑगस्टच्या आत भरेल, असा विश्वास जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी हरिचंद्र चकोर यांनी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com