रत्नागिरीत, सिंधुदुर्गात पावसाची जोरदार बॅटिंग

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यात सर्वदूर कमी अधिक पावसाने हजेरी लावल्यानंतर गेले दोन दिवस काही भागांत पावसाची उघडीप होती. तर काही ठिकाणी ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाच्या सरी सुरूच होत्या.
Heavy Rains
Heavy RainsAgrowon

पुणे : मॉन्सूनच्या पावसाने (Heavy Rains) दक्षिण कोकणात दमदार हजेरी लावली आहे. रत्नागिरीत धुवाधार बरसणाऱ्या पावसाने सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत जोरदार बॅटिंग केली. रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरीतील लांजा येथे सर्वाधिक २७५ मिलिमीटर, तर रत्नागिरी येथे २२२ पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यात सर्वदूर कमी अधिक पावसाने हजेरी लावल्यानंतर गेले दोन दिवस काही भागांत पावसाची उघडीप होती. तर काही ठिकाणी ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाच्या सरी सुरूच होत्या. कोकणात मात्र मॉन्सूनच्या पावसाचा जोर (Heavy Rains) वाढल्याचे दिसून आले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचे दिसून आले.

जोरदार पावसाची प्रतीक्षा

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात (Marathawada)अनेक ठिकाणी, तर विदर्भातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. घाटमाथा आणि प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र अद्यापही समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. पेरणी झालेल्या भागातही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :

रायगड : म्हसळा ४३, श्रीवर्धन २०७, सुधागडपाली ६९.

रत्नागिरी : चिपळूण ७३, दापोली १५८, गुहागर १३४, हर्णे १६४, लांजा २७५, मंडणगड ७५, राजापूर १६९, रत्नागिरी २२२, संगमेश्‍वर १३०, वाकवली ७६.

सिंधुदुर्ग : देवगड ४२, दोडामार्ग ५९, कणकवली १५४, कुडाळ ११७, मालवण ६१, मुलदे (कृषी) ९१, सावंतवाडी ८३, वैभववाडी ८६, वेंगुर्ला ७५.

मध्य महाराष्ट्र :

नगर : अकोले ४७, पाथर्डी २९.

कोल्हापूर : चंदगड ६०, गगनबावडा ७०, राधानगरी ४०.

नाशिक : हर्सूल ३२, येवला ३०.

Heavy Rains
हरियानामध्ये बाजरीऐवजी डाळी, तेलबियांना प्रोत्साहन

मराठवाडा :

औरंगाबाद : सिल्लोड ३०.

बीड : माजलगाव ३४.

लातूर : अहमदपूर ४६, चाकूर ३९, जळकोट ३८, उदगीर ३२.

नांदेड : हिमायतनगर ७०, मुखेड ७६.

परभणी : धालेगाव २५, गंगाखेड ४७, पालम २८.

विदर्भ :

अकोला : तेल्हारा २८,

भंडारा : लाखणी २४.

गोंदिया : देवरी २१.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com