Leopard Attack : कांदा चाळीचे कुंपण तोडून बिबट्याकडून कालवड फस्त

शेतशिवारात दिसणारे बिबटे अनेक शेतकऱ्यांना दिवसादेखील दर्शन देत आहे.
Bibtya Attack
Bibtya AttackAgrowon

Leopard Attack Dhule News : देऊरचा माथा (ता. धुळे) शिवारात बिबट्याने कांदा चाळीचे (Onion Chawl) तारेचे कुंपण तोडून हल्ला करून कालवड (वासरी) फस्त केली. वनविभागाच्या पाळीव प्राणी बंदिस्त ठेवा या आवाहनावर युक्ती शोधत बिबट्याने (Leopard Attack) वनविभागापुढेच (Forest Department) ‘चॅलेंज’ उभे केले आहे.

बिबट्या आता बंदिस्त पाळीव प्राण्यांवरदेखील हल्ला करत असल्याने शेतकरीही हतबल झाले आहेत.

येथील शेतकरी बापू जिभाऊ मांडवडे (खाकुर्डीकर) यांचे देऊरचा माथा शिवारात शेत आहे. सोमवारी रात्री शेतात कांदा चाळीत बांधलेल्या कालवडीची, कुंपणाची तार तोडून व जमीन कोरत बिबट्याने शिकार केली. त्यामुळे परिसरात आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Bibtya Attack
Leopard Attack : चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

भारनियमनामुळे पाणी भरण्यासाठी श्री. मांडवडे यांची दोन्ही मुले रात्री दहाच्या सुमारास शेतात गेले होते. ते दुचाकीवरून खाली उतरत असताना काही फूट अंतरावरील कांदा चाळीत बिबट्या कालवडीवर हल्ला करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी आरोळ्या मारताच बिबट्या पसार झाला. तर घाबरल्यामुळे श्री. मांडवडे‌ यांची दोन्ही मुले व परिसरातील शेतकऱ्यांनीही घर गाठले. सकाळी शेतकरी शेतात गेल्यावर बिबट्याने मृत कालवडीचा शेष भागही खाल्ल्याचे दिसून आले.

‌‌‌‌‌बिबट्यांचा मुक्त संचार

शेतशिवारात दिसणारे बिबटे अनेक शेतकऱ्यांना दिवसादेखील दर्शन देत आहे.

महिन्याभरापासून येथील बोरमळा, काकोर, डोंगऱ्यादेव, चिंचखेडा, जुन्या वसमार, बेहेड शिवारात दहशत पसरविल्यानंतर बिबट्याने आपला मोर्चा देऊरचा माथा शिवाराकडे वळविला आहे. दिवसा बिनधास्त असणारे शेतकरी रात्री मात्र भीतीमुळे शेतात जाण्यास धजावत नाहीत.

Bibtya Attack
Junnar Leopard News: जुन्नरला नागरी वस्तीतील पाचवा बिबट्या जेरबंद

धुळे-साक्रीचा सीमा प्रश्‍न...

नाल्याच्या दोन्ही बाजूस धुळे व साक्री तालुक्याची सीमा आहे. ककाणी नाला अर्थात देवीनदीच्या एका बाजूस म्हसदी (ता. साक्री) आणि पलीकडच्या बाजूस देऊर (ता. धुळे) शिवार म्हणून महसुलात नोंद आहे. म्हसदी येथील अनेक शेतकऱ्यांची शेती देऊर शिवारात आहे.

वनपशूंचा हल्ला झाल्यावर म्हसदीच्या शेतकऱ्यांस देऊर शिवारात शेत असल्याने धुळे तालुक्यातील प्रशासनाची दारे ठोठावावी लागतात. अशावेळी सर्वच शेतकऱ्यांना माहिती नसते. पिंपळनेर व धुळे तालुक्याच्या दोन्ही वनविभागाच्या कार्यालयाकडे शेतकरी कैफियत मांडतात.

यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांस कधीतरी वनकर्मचाऱ्यांची टोलवाटोलवी ऐकावी लागते. ती हद्द आमची नाही...वगैरे. अशी टोलवाटोलवी केली जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com