Ola Dushkal : शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत द्या : आदित्य ठाकरे

तसेच शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची मदत द्या, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
Aditya Thackeray
Aditya ThackerayAgrowon

परतीच्या पावसामुळे (Rain) राज्यातील शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. शेतात अजूनही पाणी साचलेलं आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा. तसेच शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची मदत द्या, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (Shivsena) युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली आहे.

शनिवारी (ता.२९) दुपारी आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतील. राज्यातील टाटा एअरबस कंपनीचा (Tata Airbus) प्रकल्प बाहेर राज्यात सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने गेल्याचा आरोप करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार आंबादास दानवे आणि राज्याचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.

राज्यातील बळीराजा सध्या खचलेला आहे. त्याला आधाराची गरज आहे. मात्र राज्य सरकारचा एकही मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेलेला नाही, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.

Aditya Thackeray
Tata Airbus : ३ महिन्यात ४ मोठे प्रकल्प राज्याबाहेर

शनिवारपासून (ता.२९) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी नंदुरबार जिल्ह्याला भेट दिली. पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "आमच्या सरकारने शेतकऱ्यांना आजवरची सर्वात जास्त मदत दिली आहे. निकष डावलून मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मदत दिली आहे. जे निकषात बसत नव्हते त्यांनाही नुकसान भरपाई दिली आहे."

आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले, "आदित्य ठाकरे यांची टीका म्हणजे चोर मचाये चोर अशी आहे."

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com