Tur Rate : तुरीला बाजारसमितीत हमीभावापेक्षा अधिक दर

तुरीला बाजारात जास्त दर मिळत असल्याने नाफेडच्या खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.
Tur Bajarbhav
Tur BajarbhavAgrowon

Buldana Tur Market News : शासकीय हमीभाव योजनेत (Tur MSP) नाफेडच्या (NAFED) खरेदी केंद्रात क्विंटलमागे हजार रुपयांची तफावत असल्याने तूर कृषी उत्पन्न बाजार समितीत विकण्याकडेच शेतकऱ्यांचा कल आहे. तालुक्यात दहा दिवसांत एकाही शेतकऱ्याने नाफेडकडे नोंदणी केलेली नाही.

शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा म्हणून नाफेडच्या शासकीय खरेदी केंद्रांची निर्मिती झाली. मात्र जर शेतमालाला बाजार समितीत जास्त भाव मिळाला तर शेतकरी तो इथेच विकणे पसंत करतात, असे दिसून येते.

नाफेडकडून तुरीला प्रति क्विंटल ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर करून १५ फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन खरेदी विक्री समितीने केले.

Tur Bajarbhav
Tur Rate: तुरीला आज, २७ फेब्रुवारीला कोणत्या बाजारात किती भाव मिळाला? कुठे मिळाला सर्वाधिक बाजारभाव?

परंतु गेल्या दहा दिवसांत एकाही शेतकऱ्याने नोंदणी केलेली नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीत ७ हजार ५०० ते ८ हजार ३० रुपये क्विंटल तुरीला भाव मिळत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर माल बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. पाचशे क्विंटल पेक्षा जास्त तूर मालाची आवक होत आहे.

हरभरा खरेदीची गरज

हरभरा नोंदणीची सुरुवात नाफेडने त्वरित सुरू करण्याची मात्र मागणी होत आहे. कारण बाजार समितीत हरभऱ्याला भाव कमी आहे.

सध्या हरभरा पीक काढणीला मोठा वेग आला आहे. वातावरणात उष्णता वाढत असल्याने पीक लवकर काढणीला येत आहे. त्यामुळे बाजारात हरभरा आवक रोज चढत्या क्रमाने होत आहे. ४ हजार १०० ते साडेचार हजारापर्यंत भाव मिळत आहे.

Tur Bajarbhav
Tur Rate : तुरीची उत्पादकता हेक्टरी सहा क्विंटल

नाफेडचा हमीभाव प्रति क्विंटल ५ हजार ३३० म्हणजे बाजार समितीपेक्षा अधिक आहे. म्हणून नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.

बाजार समितीत व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला हरभरा शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारीच चढ्या भावाने नाफेडला विकतात असा अनुभव आहे. मोठे श्रीमंत शेतकरीही हरभरा खरेदी करून जास्त भावात नाफेडच्या केंद्रांवर विकतात असेही दिसून आलेले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com