सह्याद्रीच्या कुशीतला पाहुणचार

जलाशयातल्या आटलेल्या पाण्याची कसर आज्जीच्या जीवनाच्या कैफियतीने भरून निघत होती. ते आयुष्याचे तरंग चालते बोलते अभंग वाटायला लागले. नंतर ती चर्चा पार पिकपाणी, शेती, बी-बियाणे, रानावर आली.‘च्या ठेवते पण दूध नाही. कोरा चालेल का?’ अशा आग्रहानंतर ‘नको नको’ म्हटल्यावर आज्जी पुन्हा आत गेली आणि भुईमुगाच्या शेंगाची ताटली भरून बाहेर घेऊन आली.
Agriculture
Agriculture Agrowon

कुटुंब कबिल्यासोबत महाबळेश्‍वर आटपून वाई-मेनवली-जांभळी असा फेरफटका मारत असताना आंब्याच्या झाडाखाली पिकून पडलेल्या गावरान आंब्याचे सडेच्या सडे पाहत काही आंबे चाखण्याचा मोह आवरता आला नाही.

गाडी थांबवली आणि सायकलवर जाणाऱ्या दोन पोरांनाच विनंती केली- ‘आरे, हे आंबे देता का?’ पोरं एकमेकांकडं बघू लागली आणि लगेचच चार आंबे पाडून आम्हाला देऊन गेलीत. पडलेले कदाचित चांगले नसावेत. लागलीच एक फोडून चोखून संपवत पुढे जात होतो, तर खावली गावाजवळ एका बांधावर चाफ्याचं झाड दिसलं. चाफ्याच्या फुलांचा सडा पडलेला पाहून गाडी हळू केली आणि हात करून सर्वांना दाखवू लागलो, तर समोरून या आज्जीनं दरारा दाखवतच हात केला- ‘ये, काय पायजे?’

Agriculture
Agriculture Machinery : कृषी अवजारांवर होतेय सातत्यपूर्ण संशोधन

मी म्हणालो, ‘‘आज्जी, ही चाफ्याची फांदी भेटेल काय ओ?’’ आज्जीनं हात केला. ‘ये, हिकडं ये.’

गाडी बाजूला थांबवून आम्ही सगळेच गाडीतून बाहेर आलो. १०-१५ फूट बांध चढून आज्जीच्या ओप्यात पोहोचलो. अवांत लगेच रानात बागडू लागला. आज्जी म्हणाली, की जा त्या कडच्या झाडाची फांदी घे. छान फुलं येतात. तुला पायजेल तर ही पानफुटीची पानं घेऊन जा.

Agriculture
Agriculture Drone : शासन ‘ड्रोन शेती’च्या प्रसारासाठी प्रयत्न करणार

जरा पाणी द्या म्हटल्यावर आज्जी बिगी बिगी तिच्या छोट्या घरात गेली. आम्हा पाच लोकांना बसायला येईल एवढी तरटी अंथरली आणि कळशीतून समोरच दिसणाऱ्या जलाशयातून आणलेल्या पाण्याचे दोन तांबे भरून आमचा पाहुणचार करू लागली. तुम्हाला पाणी कुठलं म्हटल्यावर, आज्जीनं हे समोरचंच आम्हाला पाणी म्हणून सांगितलं.

आज्जी पुन्हा आत गेली. अवांतला एक मोठ्ठा आंबा लेकराला म्हणून घेऊन आली. सासूबाईंनी सुरी मागवून आज्जीलापण एक फोड म्हणून वाटून तुमचं गाव आमचं गावं. तुमचा हा मुलगा? ही सून का? अशा गप्पा सुरू केल्या. जलाशयातल्या आटलेल्या पाण्याची कसर आज्जीच्या जीवनाच्या कैफियतीने भरून निघत होती. ते आयुष्याचे तरंग चालते बोलते अभंग वाटायला लागले. नंतर ती चर्चा पार पीकपाणी, शेती, बी-बियाणे, रानावर आली.

‘च्या ठेवते. पण दूध नाही. कोरा चालेल का?’ अशा आग्रहानंतर ‘नको नको’ म्हटल्यावर आज्जी पुन्हा आत गेली आणि भुईमुगाच्या शेंगाची ताटली भरून बाहेर घेऊन आली. ‘या तरी खावा.’ या ओप्यातल्याच आहेत म्हणत शब्दांचे तरंग आज्जीच्या तोंडून पुन्हा यायला सुरू झाले. तरंगांना तोडत मी आज्जीला नाव विचारलं. आज्जी म्हणाली शेलार. आम्ही मावळं. अवांत तोवर एकेक शेंग फोडायला लागला आणि आज्जी शब्द शब्द करत आजूबाजूचा सह्याद्री वर्णू लागली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com