शेतमालाचे रेसिड्यू व्यवस्थापन कसे कराल?

शेतकऱ्यांनी पीक संरक्षणाच्या महत्त्वाच्या बाबींकडे काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
Residue Free farm produce
Residue Free farm produceAgrowon

वैविध्यपूर्ण पिकांच्या दर्जेदार उत्पादनांत महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. त्यामुळेच राज्यातील फळे-फुले-भाजीपाला देशभरच नाही तर जगभर पोचतो. शेतमालाच्या एकूण निर्यातीत राज्याचा वाटा ६० टक्केहून अधिक आहे. द्राक्ष, डाळिंब, कांदा आदींच्या निर्यातीत तर हा वाटा ८० ते ९० टक्के आहे. मागील सात-आठ वर्षांचा अनुभव पाहता शेतमाल निर्यातीत राज्याने चांगलीच घडी बसविली आहे. शेतमालाचा दर्जा आणि मानवी आरोग्य सुरक्षितता याबाबतीत अनेक देशांनी नवनवीन कठोर नियम, निकष, अटी लावल्या आहेत. युरोपियन देश किंवा अन्य देशांचे निर्यात माला संबंधीचे नियम अत्यंत काटेकोर आहेत. परदेशी ग्राहकांबरोबरच भारतीय ग्राहक ही शेतीमालातील रासायनिक अवशेष याबाबत जागरूक होत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांनी पीक संरक्षणाच्या महत्त्वाच्या बाबींकडे काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो पीक संरक्षणातील पी एच आय (PHI) व एम आर एल (MRL) या दोन गोष्टींबाबत आपण अत्यंत गांभीर्याने विचार करायला हवा.

Residue Free farm produce
दहा एकरांत हायड्रोपोनिक्स तंत्राने ‘रेसिड्यू फ्री’भाजीपाला

कीडनाशकांच्या एम आर एल (मॅक्झिमम रेसिड्यू लेव्हल) म्हणजे काय?


एम आर एल म्हणजे कमाल अवशेष पातळी ही संज्ञा एका शब्दात स्पष्ट होणारी नाही याचा संबंध किडनाशकाचा वापर तुम्ही कशा प्रकारे करता याच्याशी जोडला गेला आहे. एखाद्या पिकात एखाद्या किडनाशकाचा वापर शेतकऱ्यांनी लेबल क्लेम प्रमाणे म्हणजे शिफारस केल्याप्रमाणे किंवा आदर्श शेती पद्धतीप्रमाणे केला असेल तरी त्याचे काही प्रमाणात तरी अवशेष शेतमालात राहणार. मात्र हे अवशेष किती प्रमाणात राहावे? याची एक पातळीवर मर्यादा ठरवली जाते यालाच एम आर एल असे म्हणतात.

पी एच आय (प्री हार्वेस्ट इंटरवल) म्हणजे काय?


कीडनाशकाच्या प्रत्येक लेबल क्लेम मध्ये म्हणजेच त्याच्या शिफारशींच्या तक्त्यामध्ये एक पी एच आय चा कॉलम असतो. पीएचआय म्हणजे शेवटची फवारणी ते पीक काढणी यांच्यातील कालावधी किंवा फवारणीचा काढणीपूर्वक प्रतीक्षा काळ. कोणतेही कीडनाशक जेव्हा वापरले जाते तेव्हा त्या संबंधित पिकावर त्याचे अवशेष हे राहतातच. मात्र हे अवशेष किती प्रमाणात राहावे त्याची एक मर्यादा ठरवून दिली आहे. पीक काढणी काढण्यापूर्वी फवारणी केव्हा थांबवावी जेणेकरून या मर्यादेपेक्षा म्हणजेच एम आर एल पेक्षा जास्त अवशेष राहणार नाहीत तो कालावधी किंवा दिवस म्हणजेच पी एच आय असतो.

Residue Free farm produce
शेतकऱ्यांनी शेतमालाचे प्रक्रियेनंतर ब्रॅंडिंग करावे : चलवदे

आपल्या निर्यातक्षम शेतमालाचे कीडनाशक अवशेष व्यवस्थापनासाठी एमआरएल आणि पीएचआय चा अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच पुढील मार्गदर्शक सूचनांचाही अवलंब करणे आवश्यक आहे..

- अधिकृत केंद्रीय किडनाशक मंडळ व नोंदणी समिती शिफारशीनुसार कीडनाशकांचा वापर करावा.
- शिफारस केलेला काढणीपूर्वक कालावधी उलटल्यावरच पिकाची काढणी करावी.
- कीडनाशक उत्पादनाचे लेबल क्लेम काळजीपूर्वक वाचावेत.
- कीडनाशक फवारणी पूर्वी किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळी विचारात घेऊन आवश्यक असेल तरच फवारणी करावी.
-रासायनिक कीडनाशकांचा वापर पिकांच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात करावा.
- पीक काढणीच्या काळात वनस्पतीजन्य कीडनाशके तसेच जैविक घटकांचा उपयोग करून एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रानुसार पीक संरक्षण करावे.
- फळे व भाजीपाला काढणी योग्य झाल्यावर म्हणजे काढणीपूर्वी व एक ते दीड महिना अगोदर रासायनिक कीडनाशकाची फवारणी बंद करावी. त्याऐवजी जैविक कीडनाशके वापरावीत.
- मानवी आरोग्याला व पर्यावरणाला कमी हानिकारक असलेली तसेच कमी मात्रे मध्ये अधिक परिणामकारक कीड नियंत्रण करणारे निवडक कीडनाशके वापरावीत.
- वापरावर बंदी असलेली कीडनाशके वापरू नयेत.
- निर्यातीपूर्वी शेतमालाची कीडनाशक अंश तपासणी करून अंश नसण्याची खात्री करावी व मगच निर्यात करावी.
- एकाच गटातील कीडनाशकाचा वापर न करता वेगवेगळी किडनाशके वापरावीत.
- कीडनाशकांच्या फवारणीनंतर पाळावयाच्या प्रतीक्षा कालावधी संबंधित कीटकनाशकांच्या वेस्टनावर किंवा माहितीपत्रिकेवर नमूद केलेले असतात त्याचे पालन करावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com