Global Vikas Trust : मराठवाड्यातील 'ग्लोबल विकास ट्रस्ट'ची सुरुवात कशी झाली ?

‘आप’मधून बाहेर पडलेल्या मयांक गांधी यांनी सामाजिक काम करण्यासाठी खेड्यांची वाट धरली. त्यांची ग्लोबल विकास ट्र्स्ट ही संस्था मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी काम करत आहे.
Global Vikas Trust
Global Vikas TrustAgrowon

‘आप’मधून बाहेर पडलेल्या मयांक गांधी (Mayank Gandhi) यांनी सामाजिक काम (Social Work) करण्यासाठी खेड्यांची वाट धरली. त्यांची ग्लोबल विकास ट्र्स्ट (Global Vikas Trust) ही संस्था मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. शेतकऱ्यांचा आत्महत्यामुक्तीकडे (Farmer Suicide) प्रवास करत असताना बळीराजाच्या उत्पन्नात चार पट वाढ करण्याचा संस्थेचा उद्देश आहे.

Global Vikas Trust
Reserved Water : जळगावात ७९.९८ दलघमी पाणी होणार आरक्षित

भारतात समाजसेवा संस्था किती असाव्यात? काही अंदाज? लाख, दोन लाख, पाच लाख! सपशेल चूक. आज आपल्या देशात तब्बल ३२ लाख समाजसेवी संस्था आहेत. एवढा नंबर वाढण्याचे कारण म्हणजे त्यांनी पांघरलेला समाज सेवेचा बुरखा. आत काय आहे? निव्वळ स्वार्थ. चार लोक एकत्र येतात, कागदपत्रे गोळा करून धर्मादाय आयुक्तासमोर उभे राहतात.

Global Vikas Trust
Rural Development : मार्गदर्शन, नेतृत्व, लोकसहभाग ही ग्रामविकासाची त्रिसूत्री : गमे

एका हातात रजिस्ट्रेशन मिळते आणि दुसऱ्या हातात लगेच मदतीचा वाडगा येतो. समाजसेवेची ही शोकांतिक आहे. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये त्यांना एक धक्कादायक सत्य आढळले. अस्तित्वात असलेल्या समाजसेवी संस्थापैकी प्रत्यक्ष प्रामाणिकपणे तळागाळामधील रंजल्या गांजल्यापर्यंत पोहोचून काम करणाऱ्या संस्था एक टक्क्यापेक्षा कमी म्हणजे काही हजारांमध्येच आहेत.

दोष कुणाचा? जो मदत करतो त्याचा की ज्याला मदत मिळते त्याचा. मी तर म्हणेन की जो मदत करतो त्याच्याच खरा दोष आहे. मदत ज्या उद्देशापोटी केली आहे तेथे ती पोहोचली आहे काय? मदतीमुळे काही बदल झाला आहे काय? हे सर्व प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणे हे मदत करणाऱ्याने म्हणजे उद्दयोग समूहाने पाहणे गरजेचे असते; पण दुर्दैवाने तसे घडत नाही. अनेक उद्योग समूह मदत करतात, पण त्या मदतीचे पुढे काय होते याकडे त्यांचे लक्ष नसते. अनेक सामाजिक संस्था चांगले काम करतात; पण दुर्दैवाने ते त्यांच्या खोप्यामध्येच राहतात.

आपली प्रतिकृती ते इतरत्र निर्माण करत नाहीत, मात्र त्यांच्याकडे मदतीचा ओघ सुरूच असतो. अर्थात, या सगळ्याला काही अपवाद जरूर आहेत. मराठवाड्यातील परळी येथे ग्लोबल विकास ट्र्स्ट ही संस्था शेतकऱ्यांसाठी तळमळीने काम करत आहे. शेतकऱ्यांचा आत्महत्यामुक्तीकडे प्रवास करत असताना बळीराजाच्या उत्पन्नात चार पट वाढ करण्याचा संस्थेचा उद्देश आहे. हे काम फक्त परळीपुरते मर्यादित न ठेवता अशा हजारो यशोगाथा तयार करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. संस्था आज देशातील १६ हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यात मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि तेथील साडेनऊ हजार शेतकरी संस्थेशी जोडले गेले आहेत...

(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com