Jaggery Powder : गूळ पावडर कशी तयार केली जाते?

अलीकडे गूळ पावडरीची मागणी वाढलीय. विविध पदार्थात गुळाचा वापर केला जातो. गूळ वापरताना शक्यतो तो बारीक करुन पदार्थात मिसळला जातो.
Jaggery Powder
Jaggery PowderAgrowon

अलीकडे गूळ पावडरीची (Jaggery Powder) मागणी वाढलीय. विविध पदार्थात गुळाचा वापर (Jaggery Use) केला जातो. गूळ वापरताना शक्यतो तो बारीक करुन पदार्थात मिसळला जातो.

गूळ फोडून तो बारीक करण्याची प्रक्रिया मात्र खुपच वेळखाऊ आणि कंटाळवाणी असते. त्यामुळे अलीकडे गुळाच्या तयार पावडर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो.

कारण तयार गूळ पावडर वापरुन तयार केला जाणार पदार्थही झटपट तयार होतो. त्यामुळे शहरी भागातील नौकरदार महिला, गृहीणी गूळ पावडर खरेदी करण्याला प्राधान्य देतात. 

ही गूळ पावडर इतकी सुटसुटीत, बारीक  आणि आकर्षक रंगाची कशी काय असते? असा प्रश्न आपल्याला पडतो.

तर ही गूळ पावडर कशी तयार केली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? महात्मा फुले कृषी विद्यापीठाने गूळ पावडर कशी तयार केली जाते? याची सविस्तर दिलेली माहिती पाहुया.  

Jaggery Powder
Chicken Cake: चिकन वडी कशी तयार केली जाते ?

गुळापासून तयार केलेल्या पावडरचा रंग विशिष्ट गुणधर्मामुळे गुळापेक्षा अधिक उठावदार असतो.

गूळ पावडर मध्ये ओलाव्याच प्रमाण अत्यंत कमी असल्यान साध्या गुळापेक्षा गूळ पावडरीची साठवणक्षमता चांगली असते.

गूळ पावडर तयार करताना कल्हईच तयार केलेला पातळ गूळ साच्यात न भरता वाफ्यातच थंड केला जातो.

गूळ वाफ्यात घट्ट होण्यापूर्वीच दाताळल्याने उभ्या व आडव्या रेघा मारून हलवून घेऊन गुळाचे लहान तुकडे केले जातात. गुळाचे हे तुकडे वाफ्यात घट्ट झाल्यानंतर सूर्यप्रकाशात कापडाच्या आवरणाखाली ठेवून वाळवतात. 

वाळलेला गूळ लाकडी बडव्याने बारीक करुन वेगवेगळ्या चाळण्यातून चाळला जातो. चाळलेल्या गुळाची पावडर दोन ते तीन दिवस वाळवून त्यातील आद्रतेच प्रमाण कमी केल जातं.

पावडरच्या आकाराच्या वर्गवारीनुसार पॉलिथिनच्या आकर्षक पीशव्यांतून गूळ पावडरीच पॅकिंग केल जात.  

पॉली पॅक केलेल्या गूळ पावडरच्या प्रतीवर कोणताही परिणाम न होता दोन-तीन वर्ष गूळ पावडर चांगल्या स्थितीत राहते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com