Onion Market: लासलगावचा कायापालट कांद्याने कसा केला?

गेल्या काही वर्षात कांद्यापिकसंबंधी कामकाजासाठी गुजरात, मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश येथून मनुष्यबळ दाखल होते. हे पिक अनेकांना तारणारे ठरले आहे.
Onion Market
Onion MarketAgrowon

Lasalgaon Onion Market

कांद्यामुळे परिसराचा कायापालट

लासलगाव बाजार समितीच्या माहितीनुसार, मध्यवर्ती स्थानाच्या भुमिकेत बाजार समितीने स्वत:चे मुख्य व दुय्यम प्रभावक्षेत्र निर्माण केलेले आहे.

मुख्य प्रभावक्षेत्रात सभोवतालच्या ११४ गावांचा समावेश असून, दुय्यम प्रभावक्षेत्रात धुळे, जळगांव, औरंगाबाद, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांचा समावेश आहे.

मुख्य प्रभावक्षेत्रात निफाड तालुक्यातील ५९ गांवे, चांदवड तालुक्यातील २८ गांवे व येवला तालुक्यातील २७ गांवाचा समावेश होतो. तिन्ही तालुक्यातील १,६०,१८३ लोकसंख्या प्रभावक्षेत्राखाली आहे.

जेष्ठ कांदा पिक अभ्यासक व ‘नाफेड’चे संचालक नानासाहेब पाटील (NAFED) सांगतात कि, कृषी विकासात (Agriculture Development) बदलत्या संशोधनानुसार कांद्याचे क्षेत्र वाढत जाऊन हक्काचे नगदी पिक बनले. एकीकडे उत्पादनात (Onion Production) शेतकऱ्यांना शेतमजूर लागतात, तसे काढणीपश्चात व्यापाऱ्यांना मोठे मनुष्यबळ लागते.

गामात प्रामुख्याने लागवड, काढणी, वाहतूक, विक्री, हाताळणी व प्रतवारी या कामात हजारो लोकांना रोजगार मिळतो. यासह कांदा बाहेर पाठविताना लागणाऱ्या बारदानी गोण्यासाठी बारदान उद्योगात (Sackcloth Industry) येथील शेकडो महिलांना हक्काचा रोजगार मिळतो. वर्दळ कायम असल्याने अनेक व्यवसायांनी लासलगाव परिसर फुललेला आहे.

गेल्या काही वर्षात कांद्यापिकसंबंधी कामकाजासाठी गुजरात, मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश येथून मनुष्यबळ दाखल होते. हे पिक अनेकांना तारणारे ठरले आहे.

येथील प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःच्या क्षमतेनुसार उन्हाळ कांद्याची साठवणूक सुविधा आहे. लग्नसराई, सणवार, मुलांचे शिक्षण, दवाखाना, शेतीसाठी भांडवल अशा आर्थिक गरजेनुसार शेतकरी टप्प्याटप्प्याने कांद्याची विक्री करतात.

Onion Market
Onion Rate : राज्यात कांदा प्रश्न बिकट होण्याच्या मार्गावर

त्यामुळे कांद्याच्या आवकेने येथील बाजार समितीचा कांदा बाजार अन विक्रीनंतर माणसांनी बाजारपेठा फुललेल्या असतात. त्यामुळेच कृषी, व्यापार, वित्तीय सेवा असे क्षेत्र परिसरात मोठ्या प्रमाणावर विस्तारले आहे. कांदा वजा केला तर उलाढाल ठप्प होते.

त्यामुळे जर कांद्यातून पैसा आला नाही, तर बाजारपेठा सुन्यासुन्या असतात, असे येथील व्यावसायिक सांगतात. त्यामुळे येथील शेतकऱ्यांसाठी कांदा म्हणजे ‘आण-बाण-शान’ आणि ‘अर्थकारणाचा प्राण’सुद्धा आहे. त्यामुळे कांद्याचे शेतकऱ्यांच्या जीवनात अविभाज्य स्थान आहे.

Onion Market
Onion Rate : कांद्यापोटी दोन रुपयांचा चेक मिळालेल्या शेतकऱ्यांचे उपोषण, आश्‍वासनानंतर मागे

कांद्याशी जोडलेले समाजमन

“कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी” हा अभंगाच्या ओळीतून संत सावता माळी यांच्या अभंगात पांडुरंगाला स्मरताना कांद्याचा उल्लेख आढळतो.

तर कांद्यावरून अनेक म्हणी अन टोमणे आढळून येतात. शेतकरी संघटनेच पाहिलं आंदोलनसुद्धा कांद्याच्या मुद्द्यावर उभ राहिले अन तेही नाशिक जिल्ह्यातच.

या पिकाने १९८० साली सरकारची नाकेबंदी करून सरकारला दखल घ्यायला भाग पाडले होते. शेतीसह अध्यात्म, राजकारण, अर्थकारण यासह राजकीय क्षेत्रात कांद्याचे अनेक संदर्भ मिळतात.

Onion Market
Onion Rate : दर पडल्याने शेतकऱ्याने होळी दिवशीच पेटवला कांदा

कांद्यामुळे आजही राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात जनमत तयार होते. त्यामुळे येथील राजकीय भाषणात कांदा नेहमी येतोच. सहकारक्षेत्रानंतर राजकारण कुठल्या मुद्यावरून पेटत असेल, तर तो म्हणजे फक्त कांदाच आहे.

कधी कांद्याचा तुटवडा झाल्यानंतर इतर उत्पादक देशातून कांदा आयात केला जातो. मात्र चव व वासामुळे तो वेगळा असल्याने त्यास फुली मिळते. तर मागणी आणि पसंदी फक्त लासलगाव कांद्यालाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कांदा पिकासाठी लासलगाव परिसर स्थानिक माध्यमांसह आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या मथळ्यांचा भाग बनतो. अलीकडेच लासलगाव कांद्याचा गौरव करण्यासाठी भारतीय डाक विभागाने पुढाकार घेतला आहे.

जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या कांद्याला अजून आंतरराष्ट्रीय स्थळावर ऐतिहासिक व पारंपरिक मूल्य प्राप्त व्हावे, तसेच जागतिकस्तरावर हा कांदा पोहोचावा यासाठी तसेच हा वारसा जतन करण्यासाठी भारतीय टपाल विभागाने पुढाकार घेत “लासलगाव प्याज” हे विशेष टपाल पाकीट काढले आहे.

अशी आहे देशभर मागणी

राज्य....मागणी असलेली प्रमुख शहरे:

पश्चिम बंगाल...शालीमार, कोलकत्ता, चक्रधरपुर, राणीगंज, भागलपुर आदी

उत्तर प्रदेश...लखनऊ, नैनी, कानपुर, अलाहाबाद, मोगलसराई, आग्रा आदी.

दिल्ली...दिल्ली

पंजाब...लुधीयाना,जालंधर,अमृतसर, फिरोजपुर,चंदीगढ आदी.

बिहार...पटणा,गया, टाटानगर, मुझफ्फरपुर आदी

आसाम...गोहत्ती, चित्झर, तेजपूर, न्युबोंगाईगांव, करीमगंज, जलपैगुडी आदी

मध्यप्रदेश...बिलासपुर, जबलपुर, रायपुर, असन्सोल, मदन-मोहन, भोपाळ

ओरिसा...भुवनेश्वर, कटक, राऊरकेला, बेहरामपुर

कर्नाटक...बेंगलोर, दावणगिरी आदी

आंध्रप्रदेश...हैद्राबाद, विजयनगरम् आदी

तामीळनाडू...चैन्नई, त्रिचनापल्ली आदी

मिळवलेल्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठा:

बांग्लादेश, मलेशिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, सिंगापुर, इंडोनेशिया, कतार, कुवेत,मॉरिशस, सौदी अरेबिया, बेहरीन, ओमान, व्हिएतनाम सोशल रिपब्लीक, मालदीव, युनायटेड किंगडम, रियुनियन, थायलंड, ब्रुनेई, रशिया, ग्रीस, हाँग काँग, पाकीस्तान, इटली, नेदरलँड, सेशल्स, कोमोरोझ, फ्रान्स, केनिया, कॅनडा, स्पेन, युनायटेड स्टेटस् आदि देशांसह एकुण ७६ देशांना कांदा निर्यात केला जातो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com