SEDT : अनाथ, निराधारांची स्वप्नभूमी कशी ठरली ही संस्था!

परभणी जिल्ह्यातील केरवाडी (ता.पालम) येथील सामाजिक, आर्थिक विकास संस्था (Social Ecomnomic Development Trust-SEDT) अनाथांची स्वप्नभूमी म्हणून ओळखली जाते.
SEDT
SEDTAgrowon

परभणी जिल्ह्यातील केरवाडी (ता.पालम) येथील सामाजिक, आर्थिक विकास संस्था (Social Ecomnomic Development Trust-SEDT) अनाथांची स्वप्नभूमी म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक सूर्यकांत कुलकर्णी (Suryjant kulkarni) यांनी राज्यभरात बालहक्काची चळवळ उभी केली.

SEDT
Rural Development : मार्गदर्शन, नेतृत्व, लोकसहभाग ही ग्रामविकासाची त्रिसूत्री : गमे

या संस्थेमुळे शेकडो अनाथ मुले शिक्षित होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाली. तसेच संस्थेने राबविलेल्या फळबागेच्या वाडी मॉडेलची मधुर फळे अल्पभूधारक आदिवासी शेतकरी चाखत आहेत. ग्रामीण आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही संस्थेने आपली मोहोर उमटवली आहे.

सूर्यकांत कुलकर्णी यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी कायनेटिक उद्योगामध्ये तीन वर्षे सेवा केली. पण त्यांचा ओढा सामाजिक कार्याकडे असल्यामुळे त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. अनाथांसाठी काम करण्याचं ठरवलं.

उद्योगपती हस्तिमल फिरोदिया आणि पानकुंवर फिरोदिया यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. कुलकर्णी यांनी सामाजिक कामासाठी आपल्या गावाची म्हणजे केरवाडीची निवड केली. तेथे १९७६ मध्ये सामाजिक, आर्थिक विकास संस्था स्थापन केली. गावातील एका गोदामामध्ये कार्यालय थाटले.

केरवाडीतील आनंदराव पाटील यांनी राज्य रस्त्यालगतची आपली पाच एकर जमीन संस्थेला दान दिली. त्यामुळे संस्थेचे कार्यालय, विविध प्रकल्पांच्या इमारती उभारण्यासाठी जागेचा प्रश्‍न निकाली निघाला. युनिसेफच्या सहकार्याने १९८८ मध्ये पालम तालुक्यात घरोघरी स्वच्छतागृह उभारणी मोहीम राबविण्यात आली.

त्यात राज्य सरकारचा ग्रामविकास विभाग तसेच उद्योजकांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला. त्यानंतर गरोदर महिला, लहान मुलांच्या लसीकरणासाठी ५० गावांमध्ये जनजागृती केली. कपार्ट अंतर्गत केरवाडी, कांदलगाव आदी गावांमध्ये ५२ सामुदायिक विहिरी खोदण्यात आल्या. शाळा सोडून शेतात काम करणाऱ्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून ५० गावांमध्ये रात्र शाळा सुरू करण्यात आल्या. सुरुवातीला मराठवाडा आणि त्यानंतर राज्य स्तरावर बाल कामगारांसाठी विशेष काम सुरू केले. संस्था बाल हक्क, बाल कामगार, शिक्षण हक्क या मुद्यांवर काम करत आहे.

शेतीविकासाची आस

परभणी जिल्ह्याची अर्थव्यवस्था मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहे. जिल्ह्यातील ७० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. गोदावरी नदीच्या खोऱ्यातील काळी कसदार जमीन आहे. डोंगराळ भागात दगडगोट्याची जमीन आहे. विविध कारणांनी पिकांची उत्पादकता अन्य जिल्ह्यांच्या तुलनेने कमी आहे. देशातील सर्वांत गरीब जिल्ह्यच्या यादीत परभणीचा समावेश आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी संस्थेने शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतीव्यवस्थेत सुधारणा करण्याचं काम हाती घेतलं. सुमारे एक हजार शेतकऱ्यांसोबत भागीदारी केली आहे. परवडणारी शेती ही संकल्पना राबवली....

(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com