Milk : स्वच्छ दुधाचे उत्पादन कसे घ्याल?

स्वच्छ दूध उत्पादनामुळे दुधाची प्रत चांगली राहते. दुधात जिवाणूचे प्रमाण हे बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकते.
Clean Milk Production
Clean Milk ProductionAgrowon

भारताचा दूध (Milk Production) उत्पादनात जगात पहिला क्रमांक लागतो. त्यातील ७० ते ८० टक्के दूध हे ग्रामीण भागातून येते. एकूण दूध उत्पादनामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर असला तरी दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीमध्ये खूप पिछाडीवर आहे. आर्थिक परिस्थिती, शास्त्रोक्त माहितीचा अभाव, उत्पादनाबाबत निष्काळजीपणा, गोठ्याची अस्वच्छता या विविध गोष्टींमुळे गुणवत्ता पूर्ण दूध उत्पादनाकडे सहाजिकच दुर्लक्ष होते. त्यामुळे स्वच्छ दूध उत्पादनावर (Clean Milk Production) अधिक भर द्यावा लागणार आहे. दूध उत्पादन शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास दुधाचा दर्जा उत्तम राहतो. स्वच्छ दूध उत्पादनामुळे दुधाची प्रत चांगली राहते. दुधात जिवाणूचे प्रमाण हे बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकते. आणि दुधाची टिकवण क्षमता वाढते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेल्या निकषानूसार जिवाणूविरहीत दुधाचे उत्पादन घ्यावे.

Clean Milk Production
दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी दुधाची प्रत ठरते महत्त्वाची

स्वच्छ दूध उत्पादनासाठी काय काळजी घ्याल ?


- जनावरांची धार काढण्यापूर्वी कास व सड स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे. कास व सड धार काढण्यापूर्वी सौम्य पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने निर्जंतुक करून घ्यावेत.
- जनावरांची नियमित तपासणी करावी.
- जनावरांचा गोठा व परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा.
- गोठ्यातील हवा खेळती असावी.
- दूध काढण्यापूर्वी गोठ्यातील शेण मू,त्र काढून गोठा स्वच्छ करून घ्यावा.
- गोठ्यामध्ये गोचीड, माशा व डासाचा प्रादुर्भाव होऊ देऊ नये.
- प्रत्येक वर्षी गोठ्याच्या अतल्या भींतींना चुना लावावा.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे दूध काढणारी व्यक्ती निरोगी असावी. दूध काढणाऱ्या व्यक्तीने नेहमी नखे व केस कापावेत. स्वच्छ कपडे वापरावेत. तसेच डोक्यावर रुमाल बांधावा. दूध काढणाऱ्या व्यक्तीस धूम्रपानाची किंवा तंबाखू खाण्याची सवय नसावी.
- दुधाची भांडी स्वच्छ धुवून घ्यावीत. जर दूध उत्पादक मिल्किंग मशीन वापरत असेल तर ते मशीन स्वच्छ व कोमट पाण्याने धुऊन जंतू विरहित करावे.
- निमुळत्या तोंडाची भांडी दूध काढण्यासाठी वापरावीत.
- दूध ठेवण्याची जागा हवेशीर व मोकळी असावी. दुधाच्या साठवणुकीच्या ठिकाणी स्वच्छता बाळगावी.
- कांदा, लसूण, कीटकनाशके, औषधे, रंग, मासे, रॉकेल व पेट्रोल इत्यादी वस्तूच्या सानिध्यांमुळे दुधाला उग्र वास लागतो व दूध नसते. त्यामुळे अशा ठिकाणी दूध साठवू नये.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com