इतकं तर नक्कीच करू शकतो

मि त्रांसोबत गप्पागोष्टी करत असताना वेगवेगळ्या गोष्टींवर आपले बोलणे हे होतच असते. त्यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील अर्थकारण. बहुतेक लोक असं म्हणत असतात, की ‘पैसेच पुरत नाही.
इतकं तर नक्कीच करू शकतो

मित्रांसोबत गप्पागोष्टी करत असताना वेगवेगळ्या गोष्टींवर आपले बोलणे हे होतच असते. त्यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील अर्थकारण. बहुतेक लोक असं म्हणत असतात, की ‘पैसेच पुरत नाही.’ या तक्रारीच्या मुळाशी जाऊन जर विचार केला तर लक्षात येतं, की पैसा वाचवण्यासाठी आपण कितीसे प्रयत्न केले?

लोकं सहज बोलून जातात, की ‘मी मॉलमध्ये गेलो होतो एक किलो साखर विकत घ्यायला, येताना दोन मोठ्या पिशव्या भरून किराणा सामान घेऊन आलो.’ आणि लोक हे अभिमानाने सांगत सुटतात. अभिमानाने सांगण्यासारखं यात काय होतं? उलट त्या मॉलमध्ये वस्तूंचे प्रदर्शन मांडले जाते तेच मुळात तुम्ही त्या वस्तूंच्या मोहाला बळी पडावं व खूप खरेदी करावी म्हणून.

इतकं तर नक्कीच करू शकतो
Crop Damage : गव्यांच्या कळपांकडून आजऱ्यात पीक नुकसान

त्या मोहाला तुम्ही बळी पडलात की खिशाला गळती ही लागणारच. त्यामुळे मॉल आणि सुपरमार्केटमध्ये जाताना घरूनच एक यादी करून जायचं. त्या यादीच्या व्यतिरिक्त एकही वस्तू खरेदी करायची नाही. बाहेरच चमचमीत जेवण शक्यतो टाळून घरचा जेवणाचा डबा सोबत न्यावा. यामुळेही आपली पैशाची बचत होते.

ग्रामीण असो वा शहरी एक सर्वसामान्य निरीक्षण आहे की पुरुषांच्या आर्थिक व्यवहाराची घरच्या स्त्रियांना (बायको, आई, बहीण, मुलगी) यांना काहीच कल्पना नसते. पैसे उसने देणे घेणे वगैरे व्यवहार असेल तर पहिले घरच्या महिला मंडळींशी सल्ला मसलत करायला हवी. महिलांनी सुद्धा जरा शंका आली तरी पुरुषांना तो आर्थिक व्यवहार करू देऊ नये. अशाने आपण आर्थिक नुकसान टाळू शकतो.

आपला एखादा जर काही व्यवसाय असेल तर तो काय आपण समाजसेवेसाठी सुरू केलेला नाहीये. त्यामुळे भोळसटपणे चुलत-निलत, तो आमच्या आमक्याचा आमका आहे, ओळखीतले नातेसंबंध सांभाळत बसू नये. व्यवसायातले व्यवहार हे रोखीनेच करावेत. व्यवसाय हा आपण नफा कमावण्यासाठीच सुरू केलेला आहे हे मनाशी पक्क ठरवावं. स्त्री असो वा पुरूष दोघांनाही आपले जीवनमान उंचावावयाचे असते. आपले व आपल्या कुटुंबातील सदस्यांचे जीवन उंचावण्यासाठी चांगले आर्थिक उत्पन्न, संकट काळासाठीची आर्थिक तरतूद, विमा, सुरक्षित उत्पन्न असणे गरजेचे असते. झेपेल तेवढेच कर्ज घ्यावे यालाच आर्थिक साक्षरता असे म्हणतात. इतकं तर आपण नक्कीच करू शकतो!

इतकं तर नक्कीच करू शकतो
Crop Insurance : आदित्य ठाकरे यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट

आपला एखादा जर काही व्यवसाय असेल तर तो काय आपण समाजसेवेसाठी सुरू केलेला नाहीये. त्यामुळे भोळसटपणे चुलत-निलत, तो आमच्या आमक्याचा आमका आहे, ओळखीतले नातेसंबंध सांभाळत बसू नये. व्यवसायातले व्यवहार हे रोखीनेच करावेत. व्यवसाय हा आपण नफा कमावण्यासाठीच सुरू केलेला आहे हे मनाशी पक्क ठरवावं.

स्त्री असो वा पुरूष दोघांनाही आपले जीवनमान उंचावावयाचे असते. आपले व आपल्या कुटुंबातील सदस्यांचे जीवन उंचावण्यासाठी चांगले आर्थिक उत्पन्न, संकट काळासाठीची आर्थिक तरतूद, विमा, सुरक्षित उत्पन्न असणे गरजेचे असते. झेपेल तेवढेच कर्ज घ्यावे यालाच आर्थिक साक्षरता असे म्हणतात. इतकं तर आपण नक्कीच करू शकतो!

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com