Vikas Godge: तिन्ही सांजंला मला रानात जायला आवडतं...

दिवसभर घरी लोळून किंवा गावात बोंबलत फिरुन सांच्याला रानात जानारांना गावाकडं काय म्हणतात माहित नाही. म्हणजे काय तरी म्हणत असले पाहिजेत कारण गावाकडच्या भाषेत प्रत्येक गोष्टीला काही ना काही विशेषण असते.
Agriculture Story
Agriculture StoryAgrowon

विकास गोडगे

Rural Agriculture Story तिन्ही सांजंला मला रानात जायला आवडतं. कदाचित मी काहीच काम करत नसल्याने लोक रानातून (Farm) घरी येत असताना मला रानात जाऊ वाटत असावं. हे पण एक प्रकारचं प्रिव्हीलेज आहे.

दिवसभर घरी लोळून किंवा गावात बोंबलत फिरुन सांच्याला रानात जानारांना गावाकडं काय म्हणतात माहित नाही. म्हणजे काय तरी म्हणत असले पाहिजेत कारण गावाकडच्या भाषेत प्रत्येक गोष्टीला काही ना काही विशेषण असते. (Agriculture Story)

तर असं मी मी निवांत पायवाटेने निघालो की समोरुन दिवसभर रानात काम करुन येणाऱ्या लोकांच्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची हे कळत नसे. पण एकदा पुढुन राकुळ पुटा घेऊन येणारा येडा आन्ना वाट सोडून जाणाऱ्या म्हशीला शिवी देत म्हणाला, "हीला कितीबी खाऊ घाला धानात त्वांड घालनारंच, हाईक, ईकास काय म्हातारीला बघायला चालला काय?

हे एक भारीच काम झालं. "ईदुळंचं कसकाय रानात चालला?`` असं कुणी विचारलं की, मी आता सांगतो, "म्हातारीला बघायला चाललोय." ह्यामुळे एक गोष्ट झाली. लेक नाही पण नातु म्हातारीची काळजी करतो असा संदेश गावात गेला.

Agriculture Story
Vikas Godge article: मला आता कुठल्याच चहाची चव आठवत नाही...

हे एक बरंच असतंय. नाहीतर आपल्याविषयी वयाच्या तेविसाव्या वर्षी एखादी चांगली गोष्ट सांगा असं कुणी विचारलं असतं तर एकपण गोष्ट सापडली नसती. पण आता आहे. म्हातारीची काळजी घेणारा पोरगा.

आज तसा उशीरच झाला होता. आमच्या रानाजवळ जाईस्तोवर अंधार पडला. मला हा रानातला अंधार आवडतो. इथल्या अंधारात दिसण्यासाठी बॅटरीची गरज पडत नाही. अंधार हळुहळु पडतो आणि तो संपूर्ण पडला तरी डोळ्यांना सगळं दिसत असतं.

Agriculture Story
Vikas Godage Mithun : मिथुनचे उपकार आहेत अनेक पिढ्यांवर...

पायाखालचीच वाट असल्याने एवढं बघुन नाही चाललं तरी चालतं‌. म्हणजे आमच्या बैंलांना डोळ्याला पट्टी बांधून गाडीला झुपुन सोडलं तरी ते थेट रानात येतील. इतकी ती पायाखालची वाट.

तर हे अंधारात एकटंच चालताना माझ्या विचारांची साखळी अशी चारशेच्या वेगाने पळत असते. बहुतांश वेळा शेखचिल्लीसारखी स्वप्न बघणे वगैरे. शेखचिल्लीला नावं ठेवणारी जनता अडाणी असावी म्हणजे आहेच, या मतावर मी येऊन पोचलो आहे.

एकाच जिंदगीत हजारो जिंदग्या जगण्याची आयडिया शेखचिल्लीला भेटली होती. ती पण एक देणगीच आहे. नाहीतर अशी स्वप्नं बघायची देणगी माणसाला सोडून अजून कोणत्या प्राण्याला भेटलीय का?

तर असा विचार करत मी आमच्या विहिरीजवळ आलो. कोट्यासमोर नेहमीप्रमाणे लिंबाच्या बुडाला म्हतारी बसली होती. म्हातारं मरुन दहा वर्षे झाली होती. आता म्हतारी एकटीच असते.

माझी चाहूल लागताच म्हातारी म्हणाली, "कोणंय बापुय काय?"

"व्हय...मीचंय.. "

"नीट जा बाबुशा ईचु काट्याचं..म्हसुबाच्या पाया पड बाबा.... "

मग मी काहीच न बोलता पुढं एकटाच रानात चालत राहिलो. जरा वेळ रान तुडवुन म्हसोबासमोर जाणार तर तिथलं दृष्य पाहून तिथंच थबकलो आणि चला आज काहीतरी भारी करमणूक होणार म्हणून थांबलो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com