
- महारूद्र मंगनाळे
आम्ही आमच्या बागेतील फळझाडांना रासायनिक खत घालत नाही. कारण बागेसाठी आमच्याकडं पुरेसं शेणखत उपलब्ध आहे.
शिवाय ही बाग आमच्या आनंदाचा भाग आहे. व्यावसायिक हेतू इथं नाही. त्यामुळं उत्पन्न, नफा-तोटा हा विषय नाही.
मात्र शेतातील सोयाबीन व इतर पिकांना गरजेपुरतं रासायनिक खत, किटकनाशकं आम्ही वापरतो.
त्याचा वापर नाही केला तर, उत्पन्न निघणार नाही. आमची जमीन कसदार, पिकाऊ नाही. सगळ्या शेतीला शेणखतं वापरणं शक्य नाही.
तेवढं उपलब्ध होणं अशक्य आहे. किमान उत्पादनासाठी रासायनिक खत आवश्यकच आहे.
परवा चर्चेत हा धागा पकडून माझा मित्र म्हणाला, सरकारने उद्या रासायनिक खतांवर बंदी घालून, सेंद्रीय शेती सक्तीची केली तर काय करशील?
मी म्हटलं, गोवंश हत्याबंदीचा कायदा झाल्यानंतर, मी गायी पाळायच्या नाहीत, हा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली.
सेंद्रीय शेतीची सक्ती झाली तर, मी कुठलंच अन्नधान्य पिकवणार नाही. सगळं शेत पडीक पाडून तिथं म्हशी चारेन.
शेतीत सरकारची कुठलीही सक्ती मी माझ्या पद्धतीनं उधळून लावणार. माझं स्वातंत्र्य गहाण ठेऊन मी काहीच करणार नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.