Irrigation Department : पाणीचोरांचा पाटबंधारेच्या सूचनेला ठेंगा

सध्या तेथील ग्रामपंचायत धरणातून पाझरणाऱ्या पाण्यावर योजना राबवत आहे.
Pani Chori
Pani ChoriAgrowon

Water Theft Mumbai News : तालुक्यातील सगळ्यात मोठे धरण (Dam) असलेल्या पाली-भुतिवली धरणातून (Pali-Bhutivali Dam) बेकायदा पाणी उपसा होत असल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर पाटबंधारे (Irrigation Department) विभागाने तोंडी सूचना दिल्याचे सांगण्यात आले असले तरी अजूनही पाणीचोरी सुरूच असल्‍याचे दिसून येत आहे.

धरणात थेट पंप लावून उपसा करण्यात येत असल्‍याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. तक्रार करूनही पाटबंधारे विभाग कारवाई करीत नसल्‍याने पाणीचोरांचे चांगलेच फावते आहे.

कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील पाणीटंचाई दूर व्हावी आणि तेथील अधिकाधिक जमीन ओलिताखाली यावी म्हणून शासनाच्या पाटबंधारे विभागाने काही वर्षांपूर्वी पाली-भुतिवली धरणाची निर्मिती केली.

Pani Chori
Janbrung Dam : जांबरुंग धरण कागदावरच

मात्र सध्या हे धरण पाणी चोरांच्या निशाण्यावर असून थेट जलवाहिन्या टाकून दिवसाढवळ्या पाण्याची चोरी केली जात आहे.

सध्या तेथील ग्रामपंचायत धरणातून पाझरणाऱ्या पाण्यावर योजना राबवत आहे. मात्र परिसरातील बांधकाम व्यावसायिकांकडून दिवसरात्र तीन ते चार पंपाद्वारे पाणीउपसा केला जात आहे.

रायगड लघु पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या मोऱ्या कालव्यांला पाणी मिळावे म्‍हणून धरण परिसरात ठेवण्यात आल्या होत्या. मात्र काही महिन्यांपूर्वी त्या फार्महाउस मालकांनी पळविल्या तर आता धरणाचे पाणी व्यावसायिकांकडून पळविले आहे.

तक्रार करूनही पाटबंधारे विभाग कारवाई करीत नसल्‍याचे परिसरातील नागरिकांचे म्‍हणणे आहे.

याबाबत माध्यमांनी वृत्त प्रसिद्ध केल्यावर संधारण विभागाच्या रायगड लघु पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी धरण परिसरात पाहणी केली होती.

त्यानंतर संबंधित पाणी उपसा करणाऱ्या व्यावसायिकांना चार दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र आज २२ दिवस उलटूनही कारवाई करण्यात आलेली नाही.

Pani Chori
Vandri Dam : वांद्री धरण परिसर चित्रीकरणासाठी ‘हॉटस्पॉट’
पाली भुतिवली धरण परिसरात पाणी उपशाची माहिती मिळाल्‍यावर शाखा अभियंत्यांनी पाहणी केली होती. त्यानंतर संबंधितांना कारवाईसाठी चार दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. कारवाई करण्यासाठी वरिष्ठांकडून अभिप्राय मागवला आहे, तो आला की त्वरित कारवाई केली जाईल.
एस. डी. शिंदे, उपअभियंता, जलसंधारण विभाग, रायगड लघु पाटबंधारे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com