Agricultural Department : कृषी विभागाचा कारभार रिक्त पदांमुळे खिळखिळा

अकोला जिल्हा कृषी खात्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पद रिक्त आहे. कृषिसेवा वर्ग एकची तीन पदे मंजूर असून दोन रिक्त आहेत.
Agricultural Department
Agricultural DepartmentAgrowon

Akola Agricultural Department News : अकोला जिल्ह्याच्या कृषी विभागात विविध संवर्गाची ५५८ पैकी सुमारे २२० पदे रिक्त असल्याने त्याचा कामकाजावर मोठा विपरीत परिणाम होत आहे. महिनोनमहिने पदे रिक्त असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांमार्फत कामे करून घेण्याची कसरत सुरू आहे.

यात शेतकऱ्यांपर्यंत योजना गतीने पोहोचविण्यातही अडथळे निर्माण होत आहेत. ही रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज व्यक्त होत आहे.

अकोला जिल्हा कृषी खात्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (Agricultural Officer) पद रिक्त आहे. कृषिसेवा वर्ग एकची तीन पदे मंजूर असून दोन रिक्त आहेत. कृषिसेवा वर्ग दोनची १४ पदे मंजूर असून पाच रिक्त आहेत. कृषिसेवा वर्ग दोन कनिष्ठ वर्गाची ३१ पदे मंजूर असून त्यापैकी ८ रिक्त आहेत.

वर्ग तीनची सर्वाधिक १४३ पदे रिक्त आहेत. या वर्गाची ४२५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २८२ पदे भरण्यात आली. वर्ग चारचीही मंजूर ८४ पैकी ६१ पदे सध्या रिक्त आहेत.

Agricultural Department
Agriculture : ‘कृषी सेवा वर्ग-२’ संघटना विविध मागण्यांवरून आक्रमक

रिक्त पदांचा अनुशेष दर महिन्याला वाढत आहे. ‘आत्मा’ आस्थापनेवर तर वरिष्ठ दर्जाची दोन्ही पदे भरलेली नाहीत. प्रकल्प संचालक व प्रकल्प उपसंचालक ही पदे प्रभारी अधिकारी सांभाळत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या पदांवर शासनाने अधिकारीच नेमलेले नाहीत.

जिल्हा परिषदेच्या आस्थापनेची १७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी तब्बल ८ पदे रिक्त आहेत. यात कृषी सेवा वर्ग २ ची तीन पदे, तर कृषी अधिकारी (जिल्हा परिषद) गट ब (कनिष्ठ) राजपत्रित वर्गाची १४ पैकी ५ पदे सध्या रिक्त आहेत.

तक्रारींचे प्रमाण वाढले

रिक्त पदांमुळे विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या विविध संघटना, ग्रामीण भागातील शेतकरी हे लोकप्रतिनिधींकडे तक्रारी घेऊन जात आहेत.

महत्त्वाच्या व मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांमुळे उर्वरित उपलब्ध मनुष्यबळावर अतिरिक्त ताण येत आहे. ही पदे शासनस्तरावरून भरण्याची कार्यवाही होण्याची मागणी वारंवार केली जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com