Tur, Chana Market : औरंगाबाद जिल्ह्यात तूर खरेदीला प्रतिसाद नाही, तर हरभरा खरेदीला प्रतीक्षा

बाजारात अलीकडच्या दोन दिवसात तुरीचे दर जवळपास आठ हजारापर्यंत जाऊन पोहोचले आहेत.
Tur, Chana Market
Tur, Chana MarketAgrowon

Aurangabad News : जिल्ह्यात आधारभूत दराने तूर (Tur) खरेदीला प्रतिसादच मिळाला नसल्याची स्थिती आहे. दुसरीकडे नवीन हरभरा बाजारात (Gram Market) येणे सुरू झाले आहे.

हरभऱ्याचे दर (Chana Rate) आधारभूत किमतीपेक्षा कमी असताना आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी मात्र तत्परतीने का निर्णय घेतला जात नाही असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

माहितीनुसार २१ जानेवारीपासून तुरीच्या हमीदराने खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आधारभूत किमतीने शेतमाल खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदीसाठी सुरू असलेली नोंदणी ६ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.

आधारभूत किमतीने तूर खरेदीसाठी शासनाचा दर ६६०० रुपये प्रतिक्विंटल आहे. दुसरीकडे बाजारात अलीकडच्या दोन दिवसात तुरीचे दर जवळपास आठ हजारापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. त्यामुळे आधारभूत किमतीने तूर खरेदीसाठी नोंदणी करण्याला शेतकरी उत्सुक नसल्याची स्थिती आहे.

Tur, Chana Market
Chana Registration : नांदेडमध्ये हरभरा विक्रीपूर्व नोंदणी अद्याप सुरू नाही

उडीद, मुग व सोयाबीनच्या खरेदीसाठी नोंदणी व खरेदीची मुदत नुकतीच संपली आहे. मुगाची ७७५५ रुपये प्रतिक्विंटल तर उडीदाची ६६०० रुपये प्रति क्विंटल व सोयाबीनची ४३०० प्रतिक्विंटल या आधारभूत दराने खरेदी होणार होती.

परंतु मूग, उडीद, सोयाबीनच्या नोंदणीला प्रतिसाद प्रतिसादच मिळाला नाही. हरभरा बाजारात येणे सुरू झाले आहे.

हरभऱ्याचे आधारभूत दर ५३१५ रुपये प्रतिक्विंटल आहेत. दुसरीकडे बाजारात मात्र हरभरा प्रतिक्विंटल पाच हजाराच्या आतच खरेदी केला जात आहे. त्यामुळे जिल्हा पणन कार्यालयाकडे आधारभूत किमतीने हरभरा खरेदी कधी सुरू होईल याची विचारणा शेतकरी करत आहेत.

आधारभूत किमतीने शेतमाल खरेदी ही व्यवस्था शेतकऱ्यांना आधारभूत किमतीपेक्षा कमी दर मिळू नये यासाठी निर्माण केली गेली आहे.

त्यामुळे बाजारात हरभऱ्याचे दर आधारभूत किमतीपेक्षा बरेच कमी असताना तत्परतेने आधारभूत किमतीने हरभरा खरेदी का सुरू केली जात नाही, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

या ठिकाणी नोंदणी करता येणार...

जिल्ह्यात तालुका खरेदी विक्री संघ गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, औरंगाबाद तसेच संत ज्ञानेश्वर कृषी सेवा सहकारी संस्था पाचोड या ठिकाणी शेतकऱ्यांना तुरीच्या खरेदी करता ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com