
Dhule Water Issue News : शिरपूर तालुक्यातील सातपुड्यातील आदिवासी दुर्गम भागातील लोकवस्ती असलेल्या अनेक गाव-पाड्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई आता नित्याचीच झाली असून, आदिवासी बांधवांना सामना करावा लागत आहे.
सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यातील गाव-पाड्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्याचे केवळ आश्वासनाव्यतिरिक्त काहीही मिळालेले नाही. म्हणून तालुक्यातील व स्थानिक लोकप्रतिनिधी या समस्येबाबत कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये संताप खदखदत आहे.
सांगवी ग्रामपंचायतींतर्गत महामार्गाला लागून चेक नाक्याजवळ लालमातीपाडा आहे. या पाड्यात २५ वर्षांपासून पावरा समाजाची १३ ते १४ कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. या लालमातीपाड्यातील आदिवासी बांधवांना मूलभूत गरजांसाठी आजही झगडावे लागत आहे.
आदिवासी पाड्यांवर मोबाईल पोहोचले; परंतु त्यांची बॅटरी चार्ज करण्यासाठी वीज मात्र पोहोचली नाही. दोन वर्षांपूर्वी पंचायत समितीमार्फत दोन सौरदिवे बसविण्यात आले. ते सध्या सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. म्हणून आजही अंधारातच राहून जीवन जगावे लागत आहे.
पाड्याच्या पायथ्याशी एक हातपंप आहे. जीवघेणी कसरत करावी लागते, तेव्हा हंडाभर पाणी निघते. पाण्यासाठी महिलांना तासन् तास बसावे लागते. हातपंप बंद पडल्यास येथील खाज्या फुला पावरा म्हणाले, की परिसरातील दोन किलोमीटरवरील शेतातील विहिरीवरून पाणी डोक्यावर नेऊन, कुटुंबातील व्यक्तीची तहान भागवताना ज्यांच्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो अशा जनावरांनासुद्धा पाणी पाजावे लागते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.