Voter List : जळगावात मतदार याद्यांत दीड लाखावर फोटो अस्पष्ट

जिल्ह्यात ३४ लाख ६२ हजारांवर मतदार आहेत. मतदार याद्यांमध्ये तब्बल एक लाख ६३ हजार ८८९ मतदारांचे छायाचित्र ‘ब्लर’ (अस्पष्ट) आहेत.
Voter List
Voter ListAgrowon

Jalgaon News : जिल्ह्यात ३४ लाख ६२ हजारांवर मतदार आहेत. मतदार याद्यांमध्ये (Voter List) तब्बल एक लाख ६३ हजार ८८९ मतदारांचे छायाचित्र ‘ब्लर’ (अस्पष्ट) आहेत.

ते फोटो काढून त्या जागी मतदारांचे नवीन फोटो टाकण्याचे आदेश राज्य निवडणूक विभागाने (State Election Department) जिल्हा निवडणूक विभागाला (District Election Department) दिले आहेत.

त्यानुसार निवडणूक विभागाने संबंधित मतदाराच्या ‘बीएलओ’ (बूथ लेव्हल अधिकारी) मार्फत मतदारांशी संपर्क साधून फोटो अपडेट करण्याचे काम सुरू केले आहे.

Voter List
Buldana Election News : निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

आगामी एक ते दीड वर्षात लोकसभा, विधानसभा निवडणूक होतील, असे चित्र आहे. सोबतच जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, पालिकांचाही निवडणुका आहेत.

त्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार याद्या अपडेट करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाने नुकताच जळगाव जिल्ह्यातील मतदार याद्यांचे सर्वेक्षण केले. त्यात अनेक बाबींवर बोट ठेवून त्या दुरुस्तीचे आदेश दिले आहेत.

निवडणूक आयोगाने मतदारयाद्या अपडेट करण्याचे आदेश दिले आहेत. मार्च २०२३ ला असलेली मतदारयादी आगामी निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. याद्या अपडेटची कामे वेगात सुरू आहेत.
तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी, निवडणूक शाखा, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com