Nashik Market Committee Election : नाशिकमध्ये बाजार समितीत निवडणुकीत आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडी-शिवसेना शिंदे गटात प्रमुख लढत होईल असे चित्र आहे. तर काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी व शिवसेना उद्धव ठाकरे गटात टक्कर होणार आहे.
Nashik APMC Election
Nashik APMC ElectionAgrowon

Nashik Apmc Election : नाशिक जिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीमध्ये (Agriculture Produce Market Committee Election) दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची बुधवारी (ता. ५) छाननी झाल्यानंतर गुरुवारी (ता. ६) सर्व बाजार समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीतील २२७७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून त्याची यादी प्रसिद्ध करण्यात आली.

छाननीत १५१ अर्ज अवैध ठरले. याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर शुक्रवारी (ता. ७) माघारीस सुरुवात होणार असून माघारीचा अंतिम दिवस २० एप्रिल आहे. दरम्यान, याद्या जाहीर झाल्यानंतर पॅनेल नेत्यांकडून जिल्ह्यात प्रचार दौरे सुरू झाले आहेत.

बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडी-शिवसेना शिंदे गटात प्रमुख लढत होईल असे चित्र आहे. तर काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी व शिवसेना उद्धव ठाकरे गटात टक्कर होणार आहे.

त्यामुळे बाजार समिती निवडणुकीसाठी आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून जोरदार प्रचार सुरू झाला आहे.

जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट व भाजप यांच्याकडून मोर्चेबांधणी सुरू झाली होती.

Nashik APMC Election
Nashik Apmc Election : अर्ज छाननी प्रक्रियेनंतर आता माघारीकडे लक्ष

बाजार समित्यांवर वर्चस्व ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. राज्यासह केंद्रात सत्ता असलेला भाजप या निवडणुकीत ठराविक बाजार समित्यांमध्ये रिंगणात असल्याचे दिसणार आहे.

राज्यातील सत्ता बदलानंतर प्रथमच बाजार समित्यांच्या निवडणुकांचा महासंग्राम होत आहे. शिवसेनेचे दोन गट तयार झाले असून, शिवसेना व उद्धव ठाकरे गट स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरणार आहेत. बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीने एकत्रित लढावे अशा सूचना प्रदेश पातळीवरील नेत्यांनी दिल्या आहेत.

त्याप्रमाणे काही तालुक्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी झाली आहे. परंतु, तालुक्यांमधील वेगवेगळी राजकीय समीकरण बघता कुठे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीची झलक

जिल्ह्यातील राजकारण चर्चेत आले असून पिंपळगाव, लासलगाव, येवला, नांदगाव, मालेगाव, नाशिक बाजार समित्यांची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. निवडणूक बाजार समितीची असली तरी, ट्रेलर मात्र विधानसभा निवडणुकीचा दिसत आहे. येवला व लासलगाव बाजार समितीमध्ये माजी मंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष घातले आहे.

नाशिक येथे माजी खासदार देविदास पिंगळे यांच्याविरुद्ध खासदार हेमंत गोडसे, सिन्नरमध्ये आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे दिंडोरी येथे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे व आमदार नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात धनराज महाले, चांदवड येथे डॉ. आत्माराम कुंभार्डे यांचे विरोधात माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल तर मालेगावात पालकमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या गटात प्रामुख्याने लढत होईल.

यात आजी-माजी आमदारांनी थंड थोपटले आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय आखाडा तापला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com