Satara Apmc Election : सातारा जिल्ह्यात बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीकडून स्‍वबळाचा नारा

सातारा बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने गांभीर्याने घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत बाजार समितीत राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचा निर्धार पक्षाच्या आमदारांनी केला आहे.
Satara Apmc Election
Satara Apmc Election Agrowon

Satara News : सातारा जिल्ह्यातील बाजार समितींच्या निवडणुका (Satara Market Committee Election) राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असलेल्या ठिकाणी स्वबळावर, तर इतर ठिकाणी महाआघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी बैठकीत घेतला.

बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादी (Nationalist Congress Party) काँग्रेसने गांभीर्याने घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत बाजार समितीत राष्ट्रवादीची (NCP) सत्ता आणण्याचा निर्धार पक्षाच्या आमदारांनी केला आहे.

राष्ट्रवादी भवनात सोमवारी (ता.२७) बाजार समितीच्या निवडणुकीसाठीची नियोजन बैठक माजी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या वेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, सुनील माने, सत्यजित पाटणकर, राजाभाऊ उंडाळकर, सारंग पाटील, प्रदीप विधाते, मनोज पोळ, बाळासाहेब सोळसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Satara Apmc Election
Shahada Apmc Election : शहादा बाजार समिती निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरण्यासाठी पदाधिकारी ठाम

जिल्ह्यातील नऊ बाजार समितींची निवडणूक होत असून, त्यासाठी राष्ट्रवादीची रणनीती ठरविण्यात आली. वाई, लोणंद व जावळी- महाबळेश्‍वर या तीन बाजार समितींच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांना लक्ष घालावे लागणार आहे.

येथे राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे त्यांना जास्त लक्ष घालावे लागणार आहे, तर कोरेगाव बाजार समितीत राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली स्वबळावर लढेल.

येथे महाविकास आघाडीची त्यांना साथ मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. फलटण बाजार समितीत आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर यांचे राजे गटाचे स्वतंत्र पॅनेल असेल.

सातारा बाजार समितीत राष्ट्रवादीची ताकद नाही, त्यामुळे येथे अन्य कोणासोबत युती करून निवडणूक लढता येते का, याची चाचपणी होणार आहे. पाटणला विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे पॅनेल उभे राहू शकते का, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

मेढा बाजार समितीत दीपक पवार यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी एकत्रितपणे पॅनेल टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. कऱ्हाड बाजार समितीत बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीचे पॅनेल टाकणार आहेत.

खटाव बाजार समितीत काँग्रेससोबत राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा प्रयोग करेल. तो यशस्वी न झाल्यास स्वबळावर लढणार आहे. एकूणच बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने गांभीर्याने घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत बाजार समितीत राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचा निर्धार आमदारांनी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com