Mohal Water Supply : नागनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोहोळ शहराचा पाणीपुरवठा सुरळीत

मोहोळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला रेल्वे पुलाजवळ झालेल्या गळतीचे काम पूर्ण झाले असून, विस्कळित झालेला पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.
Water Supply
Water SupplyAgrowon

Solapur Water Supply News : मोहोळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला रेल्वे पुलाजवळ झालेल्या गळतीचे काम पूर्ण झाले असून, विस्कळित झालेला पाणीपुरवठा (Water Supply) सुरळीत झाला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी योगेश डोके यांनी दिली आहे.

ऐन उन्हाळा व गुरुवार (ता. २०) पासून सुरू होणाऱ्या ग्रामदैवत श्री नागनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने मोहोळवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

शहरामध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असतानाच, उन्हाळ्यातल्या झळाप्रमाणे पाणी प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले होते.

परिणामी, निवडणुका तोंडावर आल्यावर टँकरद्वारे घरोघरी मोफत पाणी देणाऱ्या इच्छुक नगरसेवकांमधील शहरातील पाणीटंचाईबाबत सुरू असलेल्या आरोप- प्रत्यारोपांमुळे राष्ट्रवादीच्याच ‘ए’ व ‘बी’ टीममध्ये कलगितुरा रंगला होता.

Water Supply
Tanker Water Supply : महाडमध्ये ३७ गाव-वाड्यांना टँकरची प्रतीक्षा

तर ठाकरे शिवसेनेने मात्र या पाण्याच्या समस्येबाबत नगरपरिषदेतील राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप केला होता.

या सर्व गदारोळात ‘सकाळ’ प्रतिनिधीने प्रत्यक्ष रेल्वे स्टेशनजवळील लिकेज झालेल्या पाइपलाइनच्या कामाच्या ठिकाणी जाऊन याबाबत अधिक माहिती घेतली असता असे दिसले की, आष्टे बंधाऱ्याजवळ घेतलेल्या विहिरीतून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो.

पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन रेल्वे रुळाजवळ लिकेज झाल्यामुळे व रेल्वे पुलाखाली भरपूर पाणी साठल्यामुळे हे पाणी आसपासच्या शेतांत जात असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या.

तर पुलाखालून ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही अडचण येत होती. परंतु संबंधित पाइपलाइनचे लिकेज काढण्यासाठी लागणारी परवानगी देण्यास रेल्वे प्रशासनाने उशीर लावल्यामुळे अनेक दिवस हे काम रेंगाळले होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com