शेततळ्यासाठी निधी अपुरा

शेततळ्याच्या (Farm Ponds) आधारे संरक्षित पाणीसाठा तयार होतो व त्यातून बागायती (Horticulture) तसेच भाजीपाला (Vegetable Crops) पिके घेण्याची संधी शेतकऱ्यांना मिळते.
Farm Ponds
Farm PondsAgrowon

पुणेः वैयक्तिक शेततळे (Farm Ponds) उभारण्यासाठी राज्यातील शेतकरी आघाडीवर असताना राज्य शासन (State Government) मात्र अपुरा निधी देत असल्याचे कृषी विभागातील (Agriculture Department) अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

विहिरींपेक्षाही शेततळे (Farm Ponds) उभारणी अधिक सोयीची ठरते. तळ्यातील पाण्याचा वापर शेतकरी काटेकोरपणे करतात. शेततळ्याच्या (Farm Ponds) आधारे संरक्षित पाणीसाठा तयार होतो व त्यातून बागायती (Horticulture) तसेच भाजीपाला (Vegetable Crops) पिके घेण्याची संधी शेतकऱ्यांना मिळते. त्यामुळेच वैयक्तिक शेततळ्याला राज्यभर प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, काही वर्षांपासून निधी अपुरा दिला जात आहे. मधल्या कालावधीत निधीदेखील थांबविण्यात आला.

Farm Ponds
warehousing law: वेअरहाऊससाठी नोंदणी सक्तीची

मागेल त्याला शेततळे योजनेत शेततळ्यासाठी (Farm Ponds) किमान एक लाख रुपये अनुदान देण्याची तयारी मूळ योजना तयार करताना सुरू होती. मात्र, मंजुरी केवळ ५० हजार रुपयांना मिळाली. आता अनेक वर्षांनंतर २५ हजारांची वाढ करुन एकूण अनुदान ७५ हजारांपर्यंत केले गेले आहे.

राज्यात ८२ टक्के शेती कोरडवाहू असल्यामुळे सिंचनाअभावी शेतकऱ्यांची प्रगती होत नाही. त्यावर शेततळे (Farm Ponds) हा सर्वोत्तम उपाय असल्याची बाब माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

Farm Ponds
Agricultural Census: कृषी गणनेसाठी होणार प्रथमच तंत्रज्ञानाचा वापर

‘‘मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचना योजना राबविण्यासाठी २०२२-२३ मध्ये वैयक्तिक शेततळ्यासाठी अवघे १०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. राज्याकरीता हा निधी अपुरा असताना त्यातही पुन्हा कृषी आयुक्तालयाच्या ताब्यात अवघे २३ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

सूक्ष्म सिंचनासाठी कोट्यवधी रुपये दिले जात असताना शेततळ्यासाठी (Farm Ponds) निधी कमी का दिला जातो, असा प्रश्‍न उपस्थित होतो. ठिबक कंपन्यांचा सामूहिक दबाव शासकीय धोरणावर असतो. परंतु, शेततळ्याच्या बाबतीत प्लास्टिक उत्पादकांची लॉबी कार्यरत नसल्यामुळे हे घडते आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

Farm Ponds
wheat silos: चार राज्यांत गहू साठवणुकीसाठी सायलोची उभारणी

सांगड घालावी म्हणजे नेमके काय?

वैयक्तिक शेततळ्याचा समावेश आता मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेत करण्यात आलेला आहे. तसेच, यंत्राद्वारे शेततळे (Farm Ponds) खोदण्यास मान्यता देण्यात आली आहे. ‘‘शक्य होईल त्या ठिकाणी शेततळे खोदाईची सांगड महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेशी घालावी, अशी सूचना कृषी खात्याने दिल्या आहेत. मात्र, सांगड घालावी म्हणजे नेमके काय करावे, याविषयी आम्हाला काहीही सांगण्यात आलेले नाही, अशी माहिती मराठवाड्यातील एका जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com