Dr. Vijayakumar Gavit : नंदुरबारला नवीन कृषी भवन इमारतीचे उद्‍घाटन

Krishi Bhawan Building : नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोचविण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.
Dr. Vijayakumar Gavit
Dr. Vijayakumar GavitAgrowon

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोचविण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Minister Dr. Vijayakumar Gavit) यांनी केले.

नंदुरबार येथील नवीन कृषी भवन इमारतीचे उद्‍घाटन पालकमंत्री डॉ. गावित हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी, प्रकल्प संचालक प्रदीप लाटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गावित म्हणाले, की आपल्या जिल्ह्यात नद्या, धरण व बॅरेजमध्ये पुरेसा पाण्याचा साठा उपलब्ध असून, हे पाणी औद्योगिक प्रकल्प, पिण्यासाठी देऊनसुद्धा प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत देऊ शकतो इतका पाणीसाठा आपल्या जिल्ह्यात आहे.

म्हणून आगामी काळात प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प, बॅरेजांना गती देण्यासाठी मागील काळात भरपूर प्रमाणात निधी दिला. त्यातून हे प्रकल्प पूर्णत्वास आले.

Dr. Vijayakumar Gavit
Agriculture Department : पुरंदर तालुक्यातील पाच गावांत उभारणार कृषी भवन

नर्मदा प्रकल्पातील आपल्या वाट्याचे पाणी आपणास मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांचे हित बघून हे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र आले तरच ही गोष्ट लवकर होऊ शकेल, असे मत त्यांनी या वेळी मांडले.

पुढे बोलताना डॉ. गावित म्हणाले, की शाश्वत सिंचनाच्या उपाययोजना होईपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उपलब्ध जलस्रोतांच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घेण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

निधी उपलब्ध करून देऊ

डाब येथील स्ट्रॉबेरी खरोखर सुंदर आहे. या भागातील स्ट्रॉबेरीचा दर्जा उत्तम असून, त्याला चवही अत्यंत चांगली आहे. याचे क्षेत्र वाढविण्याची गरज आहे. तोरणमाळ व डाब येथील थंड भागात होणाऱ्या पिकांना चालना देण्याची गरज आहे.

यासाठी नवनवीन प्रयोग करण्याची गरज आहे. तसेच ब्रोकोलीसारख्या पिकास चांगला दर असल्याने या पिकाच्या लागवडीसाठी चालना द्यावी. शेतकरी स्वत:च्या पायावर भक्कम कसा उभा राहील, तो आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा राहील याच्या मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com