Millets In Diet : तृणधान्यांचा आहारातील वापर वाढावा

नगर येथे सुरू असलेल्या साई ज्योतीयात्रा व जिल्हा कृषी महोत्सवात ‘तृणधान्य उत्पादन व प्रक्रिया’ शेतकरी परिसंवाद झाला.
Millets In Diet
Millets In DietAgrowon

Nagar Millet News : आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्याचा आहारात (Millet Diet) नियमित वापर गरजेचा आहे. अलीकडच्या काळात तृणधान्याचे क्षेत्र (Millet Acreage) कमी होत आहे. परंतु त्यांचे आरोग्यातील महत्त्व लक्षात घेता त्यांचे संवर्धन (Millet Conservation) व वाढ आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ (Millet Year) च्या निमिताने या पिकांच्या वाढीसाठी जागृती हवी असे मत तृणधान्य, भरडधान्याच्या अभ्यासक नीलिमा जोरवर (Nilima Jorwar) यांनी व्यक्त केले.

नगर येथे सुरू असलेल्या साई ज्योतीयात्रा व जिल्हा कृषी महोत्सवात ‘तृणधान्य उत्पादन व प्रक्रिया’ शेतकरी परिसंवाद झाला.

नीलिमा जोरवर यांच्यासह कृषी विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक विकास पाटील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कोल्हापूर येथील नाचणी पैदासकार डॉ. योगेश बन, बाळू घोडे, गंगाराम धिंदळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, राजाराम गायकवाड, उपसंचालक रवींद्र माने, उपविभागीय अधिकारी गहिनीनाथ कापसे, कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, कृषी अधिकारी किरण मोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Millets In Diet
Millet Diet : तृणधान्य आहार चळवळीला व्यापक स्वरूप

नीलिमा जोरवर म्हणाल्या, ‘‘नगर जिल्ह्यातील बराचसा भाग कोरडवाहू असल्याने पूर्वीपासून येथे कमी पाण्यात येणारी भरडधान्य पिके घेतली जात असत. कालांतराने बागायत क्षेत्र वाढले व या पिकाचे क्षेत्र कमी झाले.

यामध्ये पूर्व भागात राळा, वरई व ज्वारी च्या विविध जातीची पिके घेतली जात असत तर पश्चिम आगात भादली, सावा, नाचणी, वरई व बाजरी ही मुख्य पिके होती.

Millets In Diet
Millets Year 2023: भरडधान्य आहारात महत्त्वाची का आहेत?

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त या पिकांचा आहारात नियमित वापर होण्यासाठी जागरूकता निर्माण करून करून आरोग्यदायी भरडधान्यांचे जतन व संवर्धन करण्यास सर्वांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. मधुमेह नियंत्रणासाठी ज्वारी तसेच हृदयरोगासाठी बाजरी ही पिके उपयुक्त आहेत.’’

शासनाचे विशेष प्रयत्न ः विकास पाटील

विस्तार व प्रशिक्षण संचालक विकास पाटील म्हणाले, पौष्टिक तृणधान्य ज्याला मिलेट नावाने जगभरात ओळखले जाते. दुर्दैवाने गेल्या काही वर्षांपासून मिलेट पिके जसे बाजरी, नाचणी, वरई, सावा यांचे क्षेत्र घटले आहे.

परंतु त्यांचे आरोग्यातील महत्त्व लक्षात घेता त्यांचे संवर्धन व वाढ आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ च्या निमिताने या पिकांच्या वाढीसाठी व प्रक्रियांसाठी विशेष प्रयत्न शासन करत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com