का देताहेत शेतकरी 'बासमती' लागवडीस पसंती?

हरियाणातील भातपिकाच्या लागवडीस अद्याप आठवडाभराचा अवधी बाकी आहे. १५ जूनपासून राज्यात भातपिकाची लागवड सुरु होणार आहे. मात्र उत्तरेकडील कर्नाल, कुरुक्षेत्र आणि पानिपत या जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी आतापासूनच 'पुसा-१५०९'ची लागवड करायला सुरुवात केली.
का देताहेत शेतकरी 'बासमती' लागवडीस पसंती?
Pusa-1509Agrowon

तांदळाच्या दरवाढीची शक्यता गृहीत धरत हरियाणातील शेतकऱ्यांकडून या हंगामात बासमतीच्या (Basmati) 'पुसा-१५०९' या वाणाला पसंती देण्यात येत आहे. या वाणामुळे एकरी उत्पादनात वाढ होत असल्याचा विश्वास शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे यंदा हरियाणात भातपिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

वृत्तसंस्थेने यासंदर्भातील बातमी दिली. कमी पाण्यात येणाऱ्या अधिकचे उत्पादन आणि खाजगी व्यापाऱ्यांना विकल्यावर होणारा नफा लक्षात घेत शेतकऱ्यांकडून बासमतीच्या (Basmati) वाणाला पसंती दिली जात आहे.

Pusa-1509
खरीपापूर्वी आंध्रातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि हार्वेस्टरचे वाटप

हरियाणातील भातपिकाच्या लागवडीस अद्याप आठवडाभराचा अवधी बाकी आहे. १५ जूनपासून राज्यात भातपिकाची लागवड सुरु होणार आहे. मात्र उत्तरेकडील कर्नाल, कुरुक्षेत्र आणि पानिपत या जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी आतापासूनच 'पुसा-१५०९'ची लागवड करायला सुरुवात केली.

यावर्षी आपण आपल्या १० एकरात 'पुसा-१५०९' या वाणाची लागवड करणार असल्याचे लडवा येथील (जिल्हा-कुरुक्षेत्र) राज कुमार या तांदूळ उत्पादक शेतकऱ्याने म्हटले. गेल्यावर्षी या वाणापासून आपल्याला एकरी ६५ हजार रुपयांची कमाई झाली. भातपिकाच्या इतर वाणापासून एकरी ५२ हजार रुपये सुटल्याचेही त्याने नमूद केले.

Pusa-1509
केंद्र सरकारची १० लाख टन साखर निर्यातीला परवानगी

यापूर्वी आपण 'पुसा-११२१' आणि इतर वाणाची लागवड करत होतो. गेल्यावर्षी बासमतीचे (Basmati) दर वाढले त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी 'पुसा-१५०९'ची लागवड केली होती, त्यांना लाभ झाला. त्यामुळे आपणही यंदा संपूर्ण १० एकरात 'पुसा-१५०९' या वाणाचीच लागवड करण्याचा निर्णय घेतल्याचेही राजकुमार यांनी नमूद केले.

'पुसा-१५०९' हे इतर वाणांच्या तुलनेत लवकर पीक देणारे वाण आहे. तीन महिन्यांत पिक हाती येते, त्यानंतर भाजीपाला व अन्य पिकांच्या लागवडीसाठी शेतजमीन मोकळी होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

'पुसा-१५०९' खाजगी खरेदीदारांसाठी कधीही उपलब्ध आहे. सरकारी यंत्रणांकडून इतर वाणाच्या तांदळाची खरेदी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून करण्यात येते. त्यामुळे शेतकरी कमी पाण्यात, कमी काळात हाती येणाऱ्या 'पुसा-१५०९'च्या लागवडीस पसंती देतात, असे कर्नालच्या इंद्री गटातील शेतकऱ्याने सांगितले.

शेतकऱ्यांचा 'पुसा-१५०९' च्या लागवडीचा कल लक्षात घेत राज्याच्या कृषी विभागाने यंदा भातपिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ होण्याचा कयास वर्तवला आहे. यंदा राज्यात १२.५० लाख हेक्टर क्षेत्रात भातपिकाची लागवड करण्यात येईल, असा अंदाज हरियाणाचे कृषी (सांख्यिकी) सहसंचालक जगराज दंडी यांनी व्यक्त केला. त्यातील निम्म्या क्षेत्रात बासमतीच्या (Basmati) विविध वाणांची लागवड करण्यात येईल, असेही दंडी यांनी नमूद केले.

दरांतील अनिश्चिततेमुळे बासमती (Basmati Cultivation)लागवडीखालील क्षेत्रात चढ-उतार पहायला मिळत आहेत. २०१९ मध्ये राज्यात २२.७५ लाख एकर क्षेत्रात बासमती वाणाची लागवड करण्यात आली. २०२० मध्ये १९.५० लाख एकरमध्ये बासमती वाणाची लागवड करण्यात आली होती, असेही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com