Bajara Demand : तृणधान्याच्या जनजागृतीमुळे बाजरीच्या मागणीत वाढ

Bajara Market : खानदेशात बाजरीची आवक बाजारात सुरू झाली आहे. दर सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहे.
Bajara Processing
Bajara ProcessingAgrowon

Jalgaon News : खानदेशात बाजरीची आवक बाजारात सुरू झाली आहे. दर सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहे. तृधान्याबाबत जनजागृती सुरू असल्याने बाजरीच्या मागणीत वाढ झाली आहे. बाजरीला बाजारात चांगला उठाव आहे.

बाजरीची कापणी, मळणी मागील आठवड्यातच सुरू झाली आहे. डिसेंबर अखेरीस लागवड केलेल्या बाजरी पिकात मळणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे बाजरीची बाजारात आवक सुरू झाली आहे. सध्या किमान २४२५ व कमाल २६५० रुपये प्रतिक्विंटलचा दर विविध बाजार समित्यांत मिळत आहे.

बाजरीसाठी खानदेशात जळगावमधील अमळनेर, चोपडा, चाळीसगाव, धुळ्यातील धुळे, साक्री, शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा) आणि नंदुरबारमधील नंदुरबार व शहादा या बाजार समित्या प्रसिद्ध आहेत. काही शेतकरी मध्य प्रदेशातील इंदूर व बडवानीदेखील बाजरीची विक्री करतात.

Bajara Processing
Mumbai APMC : सहकारी संस्थांच्या बैठकीला हवेत ५० टक्के संचालक

बाजरीची आवक मागील आठवड्याच्या अखेरीपासून बऱ्यापैकी सुरू झाली आहे. चोपडा, अमळनेर व चाळीसगाव येथील बाजारात मिळून सध्या प्रतिदिन सरासरी ९०० क्विंटल बाजरीची आवक होत आहे.

धुळ्यातही एवढीच आवक आहे. तेथेही कमाल दर २६७० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. आवक सध्या रखडत सुरू आहे. पुढे आवक वाढेल. कारण अनेकांचे पीक कापणी होऊन शेतात आहे. पण वातावरण खराब होत असल्याने मळणी रखडली आहे.

बाजरीची पेरणी सुमारे साडेसात हजार हेक्टरवर झाली होती. ही पेरणी धुळ्यात अधिक होती. तसेच जळगावात सुमारे अडीच हजार हेक्टरवर बाजरी पीक होते. नंदुरबारातही सुमारे ११०० हेक्टरवर बाजरीचे पीक यंदा होते.

धुळ्यात सर्वाधिक शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात पेरणी झाली होती. तसेच साक्री व धुळ्यातही अनेकांनी चारा व धान्यासाठी बाजरीची पेरणी केली होती. बाजरीचे दर मागील आठ ते १० महिने स्थिर असल्याने रब्बीत पेरणी स्थिर राहिली. सध्या दर स्थिर आहेत.

Bajara Processing
Sangli APMC Election : महाविकास आघाडीविरुद्ध भाजपमध्ये सांगलीत लढत

खरेदीदारांकडून आगाऊ नोंदणी

दरम्यान, तृधान्याबाबत जनजागृती सुरू असल्याने बाजरीला मागणी आहे. खानदेशातील बाजरीचा पुरवठा उत्तर भारतातही काही एजंट करीत आहेत. तसेच राज्यातील महानगरांमधील मोठे खरेदीदारदेखील पुरवठ्यासंबंधी आगाऊ नोंदणी एजंटकडे करीत आहेत. यामुळे पुढेही बाजरीला उठाव राहील, असे संकेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com