Forest Fire : कोकणात उष्णतेच्या लाटेमुळे वणव्याच्या घटनांत वाढ

हवामान विभागानेही तापमान वाढीचा इशारा दिला आहे. पावसाळ्यात उगवलेला गवत आता पूर्णपणे सुकलेला असल्याने या आगी सहज लागत आहेत.
Forest Fire
Forest Fire Agrowon

Alibag Forest Fire News : उत्तरेकडून येणाऱ्या उष्णतेच्या लाटेमुळे (Heat Wave) कोकणातील तापमानात वाढ (Temperature) झालेली आहे. पंधरा दिवसांपूर्वी थंडीने (Cold) कुडकुडणारे नागरिक आता घामाच्या धारांनी हैराण झाले आहेत.

सध्या किमान तापमान ३० अंशाच्या आसपास पोहचले असून पुढील काही दिवसात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे जंगल भागात वणवे (Forest Fire) लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Forest Fire
Forest Fire : वणव्याने वनसंपदेचे नुकसान

हवामान विभागानेही तापमान वाढीचा इशारा दिला आहे. पावसाळ्यात उगवलेला गवत आता पूर्णपणे सुकलेला असल्याने या आगी सहज लागत आहेत.

या आगी विझवण्याचे मोठे आवाहन ग्राम वन समितीच्या सदस्यांवर येऊन पडले आहे. वन विभागानेही वणवे लागू नयेत यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Forest Fire
वणवा रोखण्यासाठी १५० गावांत जनजागृती सुरू

वाढत्या तापमानाचा परिणाम फळधारणेस आलेल्या आंबा-काजू पिकाला होण्याची शक्यता आहे. उष्णतेमुळे कोवळी फळे तग धरु शकत नसल्याचे येथील बागायतदारांचे म्हणणे आहे.

बागेतील सुकलेला गवत काहींनी अद्याप काढलेला नाही, या गवताने पेट धरल्यास पिकत्या झाडांनाही धोका पोहचण्याची शक्यता आहे.

दुपारच्या वेळी तापमानात वाढ होत असल्याने सणासुदीचे दिवस असूनही रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कमी झालेली दिसून येत आहे. आरोग्य विभागानेही या उष्णतेचा सामना करण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com