Mango Rate : आंब्यांची आवक कमी झाल्याने दरामध्ये वाढ

Mango Season : उन्हाळ्यात आमरस खाण्याची मजा काही औरच असते; मात्र यावर्षी वादळी पावसामुळे आंब्यांची आवक कमी झाली आहे. त्‍यामुळे खवय्यांसाठी आमरसाची चवही आंबट झाली आहे.
 Mango
Mango Agrowon

Mango Rate In Chembur : उन्हाळ्यात आमरस खाण्याची मजा काही औरच असते; मात्र यावर्षी वादळी पावसामुळे आंब्यांची आवक कमी झाली आहे. त्‍यामुळे खवय्यांसाठी आमरसाची चवही आंबट झाली आहे. आमरसाचे भाव वाढल्‍याने अनेकांचा हिरमोड झाल्‍याचे मुंबईत पाहायला मिळत आहे.

आंबा हे सर्वांचे आवडते फळ आहे. त्‍याच्यापासून बनणारे आमरस सर्वांनाच आवडते. त्‍यासोबतच आंब्‍यापासून आईस्क्रीम, आंबा शिरा, आंबा बर्फी, आंबा ज्यूस, आंबा मिल्कशेक असे असंख्य पदार्थ बनवले जातात.

यामध्ये आमरस हा अधिक गुणकारी मानला जातो. त्‍यामुळेच उन्हाळ्यात आमरसाला अधिक मागणी असते. सध्या मुंबईमध्ये अस्‍सल आमरसाचे भाव १० ते २० टक्‍क्‍यांनी वाढल्‍याचे विक्रेत्‍यांचे म्‍हणणे आहे.

 Mango
Hapus Mango : गुजरातमधल्या केसरीच्या एन्ट्रीने हापूसची घटली मागणी

दरम्‍यान याबाबत योगिता जाधव या महिलेने प्रतिक्रिया देताना सांगितले की, आंबे महाग झाले आहेत. त्यात रासायनिक आंबे खाणे जीवावर बेतत असल्याने आंबे घेणे आवाक्याबाहेर झाले आहे. आंबरसाची किंमत ६४० असल्‍याने तोही आवाक्‍याबाहेर आहे.

आमरसाच्या किमती

मोठा ग्‍लास - २६० ते ३०० रुपये

लहान ग्‍लास - २१५ ते २३० रुपये

पायरी आमरस - २६० रुपये किलो

हापूस आमरस - ६४० रुपये किलो

अवकाळीचा फटका

1 अवकाळी पाऊस व वादळ यामुळे मोहर गळून गेला आहे. त्‍यामुळे यावर्षी आंब्याची आवक कमी झाली आहे. बाजारात दरवर्षी हापूस व विविध जातीच्या आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

2 आवक कमी झाल्याने आंब्याच्या पाच डझन पेटीची किंमत ३५०० ते ४५०० पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे आंब्याच्या किमतीप्रमाणे आमरस खाणे महाग झाले आहे.

 Mango
Mango Orchard Management : आंबा बाग पुनरुज्जीवनाचे फायदे काय आहेत?
आंब्याची आवक कमी झाली आहे. त्‍यातच आंबा परदेशी जात आहे. त्‍यामुळे मुंबईत आंबा कमी येत आहे. सध्या सामान्य लोक आंब्याची पेटी घेत नाही. त्यातच हापूस आमरसची किंमत वाढलेली आहे. मात्र खवय्ये आमरसाची किंमत वाढली असली तरी घेत आहेत.
भरत पटेल,आमरस विक्रते

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com