Rabi Sowing : साखरखेर्डा परिसरात रब्बी लागवडीत मोठी वाढ

एकूण रब्बी क्षेत्रापैकी ५,९७१ हेक्टर क्षेत्रात म्हणजे सुमारे ६८ टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची पेरणी केली आहे.
Rabbi Season
Rabbi SeasonAgrowon

साखरखेर्डा, जि. बुलडाणा ः सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा आणि परिसरात यावर्षी झालेल्या अतिपावसामुळे (Havey Rain) शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांपासून (Kharif Crop) आर्थिक नुकसान सोसावे लागले;

मात्र जास्त झालेल्या पावसामुळे नदी, नाले, विहिरी तुडुंब भरल्याने पाण्याची उपलब्धता (Water Availability) वाढली. रब्बी पिकांच्या (Rabi Crop Sowing) पेऱ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

गहू (Wheat), हरभरा (Chana), शाळू ज्वारी (Jowar), मका (Maize), सूर्यफुल,करडीच्या पेरणीत (Safflower Sowing) लक्षणीय वाढ झाली आहे. साखरखेर्डा आणि शेंदूर्जन या दोन मंडळातील पेरणीयोग्य एकूण क्षेत्रापैकी सुमारे ३९ टक्के क्षेत्रात तर रब्बी पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी ६८ टक्के क्षेत्रात शेतकऱ्यांनी हरभरा लागवड केली आहे.

परिसरातील साखरखेर्डा व शेंदूर्जन मंडळात असलेल्या २४ गावांतील एकूण १७,४३४ हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी १५,१९३ हेक्टर क्षेत्र हे पेरणीयोग्य आहे.

या पेरणीयोग्य क्षेत्रापैकी कृषी विभागाचे वतीने रब्बी पेरणीच्या दिलेल्या अंतिम अहवालानुसार ८,७८५ हेक्टर म्हणजे ५८ टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी केली.

त्यामध्ये गहू, हरभरा, शाळू ज्वारी, मका, सूर्यफूल, करडी, कांदा व बियाण्यांचा कांदा व भाजीपाल्याचा समावेश आहे. सर्वांत जास्त पेरणी हरभऱ्याची झाली आहे.

एकूण रब्बी क्षेत्रापैकी ५,९७१ हेक्टर क्षेत्रात म्हणजे सुमारे ६८ टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची पेरणी केली आहे.

गव्हाची पेरणी १,४०९ हेक्टर क्षेत्रावर झाली असून ३८४ हेक्टर क्षेत्रात रब्बी ज्वारी, मका-१२८ हेक्टर, बियाण्याचा कांदा ३०१ हेक्टर, खाण्याचा कांदा १४८ हेक्टर, भाजीपाला व इतर ३९९ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

मागील पंधरवड्यात थंडीचे प्रमाण वाढल्याने हरभरा, गव्हाचे पीक बहरलेले असून सध्याच्या स्थितीत ही दोन्ही पिके काही ठिकाणी फुलोरावस्थेत आहेत.

Rabbi Season
Rabi Seed : विद्यापीठाच्या ३६२ क्विंटल रब्बी बियाण्याची विक्री

तर काही ठिकाणी हरभरा घाटे धरणाच्या व गहू ओंबीच्या स्थितीत आहेत. रब्बी ज्वारी जोमदार असून सध्या पोटरीत आली आहे.

मागील पंधरवड्यातील थंडीच्या व पोषक वातावरणामुळे काही ठिकाणी आंबेही उत्तम मोहरले असून नैसर्गिक आपत्ती न कोसळल्यास यावर्षी गहू, हरभरा आणि आंबे चांगले येऊ शकतात.

करडई पिकाला प्राधान्य

तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड व मंडळ अधिकारी सावंत तथा पर्यवेक्षक गणेश बंगाळे यांनी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. जवळपास ५० हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या करडई पिकाला प्राधान्य दिले आहे.

करडईला बोंड धरले असून कांदा पिकही चांगले आहे. बऱ्याच शेेतकऱ्यांनी खरिपातील कपाशीचे पीक उपटून त्यामध्ये हरभरा तथा कांदा लागवड केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com