धान खरेदी मर्यादेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

गोंदिया जिल्ह्यात केवळ ४ लाख ९० हजार क्‍विंटलची मर्यादा
धान खरेदी मर्यादेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
Paddy ProcurementAgrowon

गोंदिया ः जिल्हा मार्केटिंग फेडरशेन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदीला (Paddy Procurement) मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर शिल्लक धानाचे (Paddy) काय करावे? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात दरवर्षी जवळपास २२ ते २५ लाख क्‍विंटल धान खरेदी केली जाते. पण, यंदा शासनाने रब्बी धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला ४ लाख ९० हजार क्‍विंटलची मर्यादा ठरवून दिली आहे. त्याचवेळी दुसरीकडे यंदा धानाचे बंपर उत्पादन झाले आहे. त्यामुळे उर्वरित धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या दारात जावे लागणार आहे.

जिल्ह्यात खरिपानंतर रब्बी धान घेतला जातो. समाधानकारक पाऊस झाल्याने आणि सिंचन प्रकल्पांमध्ये पाणी शिल्लक असल्याने रब्बीच्या लागवड क्षेत्रात यंदा वाढ झाली. जिल्ह्यात २५ हजार हेक्‍टरवर धानाची लागवड करण्यात आली. रब्बीसाठी अनुकूल वातावरण मिळाल्याने धानाची उत्पादकता अधिक होण्याची शक्‍यता आहे. मात्र, शासनाने यंदा पहिल्यांदाच रब्बी धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरशेनला मर्यादा घालून दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात केवळ ४ लाख ९० हजार क्‍विंटलच धानाची खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे शिल्लक धान शेतकऱ्यांना खुल्या बाजारात विकावा लागेल. अशावेळी कमी दराने याची खरेदी होण्याची भीती वर्तविली जात आहे. परिणामी धान खरेदीची मर्यादा वाढवून देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

धानाची हेक्‍टरी नजरअंदाज उत्पादकता (क्‍विंटलमध्ये)

तालुका--उत्पादकता

गोंदिया ः ४५

गोरेगाव ः ४३

तिरोडा ः ४३

अर्जुनी मोरगाव ः ४५

देवरी ः ४३

आमगाव ः ४०

सालेकसा ः ४०

सडकअर्जुनी ः ४६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com