Valentine's Day 2023: गुलाब निर्यातीत भारताची स्पर्धा केनियाबरोबर

व्हॅलेंटाइन डे, रोझ डे निमित्त गुलाबांना जगभरातून मागणी वाढली आहे. गुलाबशेतीचे क्लस्टर असलेल्या तळेगाव दाभाडे फ्लोरिकल्चर पार्क (जि. पुणे) येथून यंदा सुमारे २० लाख तर मावळ तालुक्यातून ५० लाख फुलांची निर्यात झाल्याचा अंदाज आहे.
Rose Export
Rose ExportAgrowon

Valentine Day Special : फेब्रुवारी १४ हा दिवस जगभरात व्हॅलेंटाइन डे (Valentines Day) म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने सर्वत्र गुलाबाच्या फुलांना (Rose Flower Demand) प्रचंड मागणी असते. पुणे येथील तळेगाव दाभाडे फ्लोरिकल्चर पार्क हे गुलाबशेतीचे (Rose Farming) ‘क्लस्टर’ म्हणून प्रसिद्ध आहे.

व्हॅलेंटाइन डे साठी या भागातून देश व परदेशात फुलांची मोठ्या प्रमाणात निर्यात (Rose Flower Export) होत असते. या अनुषंगाने व्यापारी रवी प्रसाद म्हणाले की १० ते १२ वर्षांपासून तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कमधील फुले मी विविध राज्ये आणि शहरांमध्ये पाठवितो.

सध्या देशांतर्गत मागणी सुरू झाली असून ही मागणी रोझ डे (सात फेब्रुवारी) च्या दोन- तीन दिवस अगोदर सुरू होते. ती व्हॅलेंटाइन डे च्या आधी मोठ्या प्रमाणात असते.

देशांतर्गत बाजारपेठेत गुलाबाच्या विविधरंगी २० फुलांच्या जुडीला ४०० रुपये तर लाल फुलांना ३०० रुपये दर मिळत आहेत. गेल्यावर्षीचे दरही याच दरम्यान होते.

Rose Export
Rose Export : कोल्हापुरातून ‘व्हॅलेंटाइन डे’ साठीची गुलाब निर्यात पूर्णपणे ठप्प

फुलदांड्याच्या ५०, ६० आणि ७० सेंटीमीटर अशा लांबीनुसार १४ ते १८ रुपये दर मिळत आहे. तळेगाव येथून रोझ डे आणि व्हॅलेंटाइन डे च्या हंगामात देशांतर्गत बाजारपेठेत दररोज सुमारे तीन ते साडे तीन लाख फुलांचा पुरवठा होती.

याच १५ दिवसांत ४५ ते ५० लाख फुले देशांतर्गत बाजारपेठेत पाठविली जातात. अमृतसर, लुधियाना, दिल्ली, जम्मू- काश्‍मीर, पटणा, झारखंड, रायपूर, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा आदी राज्यांतील शहरामध्ये मागणी मोठी असते.

Rose Export
Rose Processing : गुलाब प्रक्रियेला चांगली संधी

केनियातून वाढती निर्यात

जागतिक बाजारपेठेत हॉलंड, लंडन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आदि देशांसह आखाती देशांकडून फुलांना मागणी असते. मात्र सध्या निर्यात भाडेशुल्कावर ‘जीएसटी’ आकारणी सुरू झाल्याचा फटका भारतीय निर्यातदारांना बसला आहे.

कोरोनावेळी फुलांची कोमेजलेली बाजारपेठ आता फुलत असताना नव्याने आलेल्या अशा जाचक अटीमुळे निर्यात खर्च वाढल्याची नाराजी निर्यातदारांनी व्यक्त केली आहे.

प्रसिद्ध निर्यातदार कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले की कोरोना काळात हे भाडेशुल्क १०० रुपयांवरून प्रति किलो ३५० ते ४०० रुपयांपर्यंत वाढले होते. नंतर ते कमी झाले. मात्र इंधनाच्या वाढलेल्या दरांमुळे हे शुल्क २०० रुपये आहे. त्यामुळे निर्यातीवर मर्यादा आल्या आहेत. ही पोकळी भरून काढण्यासाठी विविध देशांनी आफ्रिकी देशांतून फुले घेण्यास सुरवात केली आहे. भारताच्या तुलनेत

आफ्रिकी देशांमध्ये विमान भाडेशुल्क कमी आहे. परिणामी केनियातून निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केंद्र सरकारने याबाबत लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा भारतीय फुलांची बाजारपेठ केनिया काबीज करेल अशी भीती निर्यातदारांनी व्यक्त केली आहे.

नव्या वाणांची गरज

-केनियात उत्पादित होणाऱ्या गुलाबांच्या एकूण उत्पादनापैकी ९८ टक्के फुले निर्यात होतात.

-भारतातील हे प्रमाण ८० टक्के.

-भारतातील विविध राज्यांसह ‘तळेगाव’ पार्क, मावळ परिसरात १५ वर्षांपासून एकाच प्रकारच्या फुलांचे उत्पादन होते. जागतिक ग्राहकाकडून नव्या रंगांची, वाणांची मागणी होत आहे. अशावेळी केंद्र सरकारने ‘रॉयल्टी’ देऊन नवे वाण उपलब्ध करण्याची गरज निर्यातदारांकडून व्यक्त.

Rose Export
Rose Export : ‘व्हॅलेंटाइन डे’साठीची गुलाब निर्यात कोल्हापुरातून ठप्प
माझी सहा एकरांत तीन पॉलीहाऊसेस आहेत. यंदा निर्यातीसाठी ६० हजार तर डोमेस्टिक बाजारपेठेत ७० हजार फुलांचा पुरवठा केला. निर्यात आणि स्थानिक बाजारपेठेत दर सारखेच असल्याने निर्यातीसाठी फुले कमी प्रमाणात पाठविली. यंदा २० फुलांच्या प्रति जुडीला २६० ते २८० रुपये दर मिळाला. तो समाधानकारक वाटला.
व्ही. एम. जम्मा, अध्यक्ष, तळेगाव फ्लोरिकल्चर पार्क फूल उत्पादक सहकारी संस्था
यावर्षी विमान भाडेशुल्क जास्त झाल्याने निर्यातीला मर्यादा आल्या. साहजिकच ‘तळेगाव’ पार्कमधून १५ ते २० लाख फुले निर्यात झाली. अन्यथा ही संख्या २५ लाखांपर्यंत पोचली असती. यंदा विविधरंगी फुलांचे दर प्रति जुडी ३०० ते ३२० रुपये (प्रति फूल १६ रू.) राहिले. माझ्या स्वतःच्या पॉलीहाऊसमधील प्रत्येकी दोन एकर लाल आणि रंगीतपैकी एकूण एक लाख ४० हजार फुले विक्रीस केली आहेत.
मल्हारराव ढोले (९८२३४४०८०३) सचिव, तळेगाव पार्क
यंदा मावळ तालुक्यातून सुमारे ३० लाख फुलांची निर्यात तर सुमारे ५० ते ५५ लाख फुले देशांतर्गत बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्यात आली. यावर्षी निर्यातीसाठी भारतीय फुलांना मोठी मागणी होती. विमानभाडे वाढ आणि जीएसटी यामुळे खर्च वाढल्याने निर्यातदारांनी आणि विविध देशांनी केनिया, इथिओपिया आदी देशांतील फूलखरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे मावळ भागातील किमान २५ टक्के फटका निर्यातीला बसला.
मुकुंद ठाकर अध्यक्ष, पवना फूल उत्पादक संघ (ता. मावळ जि.पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com