Agriculture Export : कृषी, प्रक्रियायुक्त अन्न निर्यातीत भारताची चमकदार कामगिरी

Food Export : भारताने मागील हंगामात कृषी निर्यातीत चांगली कामगिरी केली. २०२२-२३ या वर्षात कृषी आणि प्रक्रिया अन्न निर्यातीत ९ टक्क्यांची वाढ झाली.
Agriculture Export
Agriculture ExportAgrowon

Agriculture Export Update : भारताने मागील हंगामात कृषी निर्यातीत चांगली कामगिरी केली. २०२२-२३ या वर्षात कृषी आणि प्रक्रिया अन्न निर्यातीत ९ टक्क्यांची वाढ झाली. यात तांदूळ, फळे आणि भाजीपाला, पशुधन आणि डेअरी उत्पादनांचा समावेश होता.

या वर्षात भारताने २ हजार ६३० कोटी डाॅलरची निर्यात केली. तर अपेडाच्या अंतर्गत झालेल्या निर्यातीने २ हजार ३५६ कोटी डाॅलरचे उद्दीष्ट गाठले आहे.

भारत जगातील महत्वाचा तांदूळ निर्यातदार देश आहे. एकूण जागतिक तांदूळ व्यापारात भारताचा वाटा ४५ टक्के आहे. मागीलवर्षापासून जागतिक बाजारात तांदळाची मागणी वाढली होती. पूर्व आशियातील देश, आफ्रिका आणि युरोप तसेच पाकिस्तानमधील पुरामुळे तांदळाला मागणी वाढली होती.

तसेच तांदूळ निर्यातदार देशांमध्ये भारताच्या तांदळाचे दर कमी होते. परिणामी भारताच्या तांदळाला चांगला उठाव मिळून निर्यात वाढली. भारताने जवळपास ७५ देशांना तांदूळ निर्यात केली होती.

Agriculture Export
Food Business Registration : खाद्य व्यवसायासाठी नोंदणी, परवाना का असतो महत्त्वाचा?

तांदूळ निर्यात लक्षणीय

डायरेक्टरेट जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजन्स अँड स्टॅटिस्टिक्सच्या मते, भारताच्या तांदूळ निर्यातीचे मूल्य १५ टक्क्यांची वाढले आहे. भारताने १ हजार ११० कोटी डाॅलरचा तांदूळ निर्यात केला. भारताने तुकडा तांदूळ निर्यातीवर बंद घातली होती.

तसेच पांढऱ्या तांदूळ निर्यातीवर २० टक्के निर्यातशुल्क लावले होते. असतानाही निर्यातीत ५ टक्क्यांची वाढून २२३ लाख टनांवर पोचली होती.

फळे, भाजीपाल्याची निर्यात

भारताची ताजी आणि प्रक्रियायुक्त फळे आणि भाजीपाला निर्यातही लक्षणीय वाढली. कोरोनानंतर जागतिक बाजारात फळे आणि भाजीपाला मागणी वाढली आहे. याचा फायदा भारताला होताना दिसत आहे.

भारताची निर्यात जवळपास १९ टक्क्यांनी वाढून ३८० कोटी डाॅलरवर पोचली. तसेच तृणधान्य आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादनांची निर्यात २० टक्क्यांनी वाढली. भारताने वर्षभरात ४३० कोटी डाॅलरचे तृणधान्य आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादनांची निर्यात केली.

कोणत्या पदार्थांची निर्यात घटली?

पण भारताची मांस, डेअरी आणि पोल्ट्री उत्पादनांची निर्यात काही प्रमाणात कमी झाली. मागीलवर्षात देशातील पशुधनावर विविध रोगांचं संकट आले होते. कोरोना काळात पशुधनाचे प्रजनन कमी झाले होते. तर लम्पी रोगामुळे गोवंशावर परिणाम झाला.

यामुळे देशातील दूध उत्पादन घटून तुटवडा निर्माण झाला. त्याचा परिणाम निर्यातीवर जाणवला. भारताने वर्षभरात ४०० कोटी डाॅलरची मांस, डेअरी आणि पोल्ट्री उत्पादनांची निर्यात केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com