दापोलीत इंडो-इस्राईल प्रकल्प

एकात्मिक फलोत्पादन योजनेअंतर्गत इंडो-इस्राईल प्रकल्प राबविण्यासाठी दापोली तालुक्यातील पाच गावांची निवड करण्यात आली असून, १ कोटी ८२ लाख रुपयांची तरतूद केली गेली आहे.
Indo-Israel Project
Indo-Israel ProjectAgrowon

रत्नागिरी ः एकात्मिक फलोत्पादन योजनेअंतर्गत (Integrated Horticulture Scheme) इंडो-इस्राईल प्रकल्प (Indo-Israel Project) राबविण्यासाठी दापोली तालुक्यातील पाच गावांची निवड करण्यात आली असून, १ कोटी ८२ लाख रुपयांची तरतूद केली गेली आहे. या प्रकल्पात ४०२ हेक्टरवर घन पद्धतीने लागवड (Mango Farming) आणि काही बागायतदारांकडील जुन्या बागांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून इस्राईल तंत्रज्ञानाचा हापूसमध्ये वापर करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. मागील काही वर्षांमध्ये इंडो-इस्राईल तंत्राचा वापराकडील आंबा बागायतदारांचा कल वाढलेला आहे. कोकणात उंचच उंच हापूसची झाडे आहेत. त्यामधून अपेक्षित उत्पादनही मिळत नाही. उंच झाडांवरून आंबे काढण्यासाठी मजुरांची वानवा आहेच आणि धोकाही तेवढाच आहे. हापूसचे उत्पादन वाढविण्यासाठी कमी उंचीची झाडे आणि घन पद्धतीने रोपांची लागवड करण्यावर बागायतदार भर देत आहेत. याचा विचार करून कृषी विभागाकडून इंडो-इस्राईल प्रकल्प राबविण्यासाठी दापोली तालुक्यावर लक्ष्य केंद्रित केले आहे. त्यामध्ये आंजर्ले, केळशी, कुडावळे, ओणनवसे, कोळथरे या पाच गावांचा समावेश आहे.आंबा

Indo-Israel Project
Mango Farming : संत्रा पट्ट्यात आंबा, बांबूची व्यावसायिक शेती
Indo-Israel Project
Mango : आंबा फळबागेचे संतुलित खत व्यवस्थापन

यामध्ये घन पद्धतीने आंबा लागवडीसाठी ४०२ हेक्टरचे लक्ष्य निश्‍चित केले आहे. त्याचबरोबर जुन्या बागांमधील झाडांची उंची कमी करून ती दहा फुटांपर्यंत केली जाणार आहे. बागायतदारांना अनुदानावर पॅकहाउस दिली जाणार असून शेततळे, नवीन यंत्रसामग्रीही अनुदानावर देण्यात येणार आहे. घन पद्धतीने लागवड केलेल्या बागांमध्ये आंतरपीक म्हणून मिरची लागवडीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

सुरुवातीला १ कोटी ६२ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. त्यात दुरुस्ती करून तो १ कोटी ८२ लाखाचा केला आहे. या योजनेतून ११ लाख रुपये पॅकहाउसवर खर्च केले आहेत. त्यातून १ पॅकहाउस उभारले आहे. ११३ बागायतदारांना यांत्रिकीकरणातून २६ लाख रुपये खर्च केले आहेत. शेडनेटवर दीड लाख रुपये तर ५ शेततळ्यांसाठी ५३ लाख रुपये खर्ची केले आहेत. पुढील वर्षभरात या पाच गावांमध्ये योजनेतून निधी खर्ची टाकण्यात येणार आहे.

इंडो-इस्राईल प्रकल्पाचे लाभ आंबा बागायतदारांना होणार असून, प्रायोगिक तत्त्वावर दापोली तालुक्यातील पाच गावांची निवड केली आहे. त्यामध्ये योजनेचे लाभ देण्यास सुरुवात झाली आहे.
सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

प्रकल्पाचे फायदे

* उंच झाडांची वेळेत छाटणी करणे

* मुळापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचणे आवश्यक

* आंबा काढणी सोपी

* मजूर कमी लागतात

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com