Health : संसर्गजन्य आजार न्यूमोनिया

न्यूमोनिया हा जगातील सर्वांत मोठा संसर्गजन्य आजार आहे. या आजाराने दरवर्षी जगातील २५ लाख व्यक्तींचा मृत्यू होतो.
Health
Health Agrowon

_वैद्य श्रीधर पवार

न्यूमोनिया हा जगातील सर्वांत मोठा संसर्गजन्य (Infectious) आजार आहे. या आजाराने दरवर्षी जगातील २५ लाख व्यक्तींचा मृत्यू (death) होतो. तेच लहान मुलांच्या बाबतीत पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण हे सात लाखांपेक्षा जास्त आहे. जगात पाच वर्षांखालील १५ टक्के बालकांचे मृत्यू हे फक्त न्यूमोनिया ने होतात.

विकसनशील देशांमध्ये न्यूमोनिया या आजाराने होणारे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे विकसनशील देशात विशेष जनजागृती करणे गरजेचे आहे. १२ नोव्हेंबर हा दिवस जागतिक न्यूमोनिया दिन म्हणून पाळला जातो. कोरोना महामारीमुळे न्यूमोनिया हा आजार जास्त भीतीदायक झाला आहे. त्यामुळे याबाबत जास्त जनजागृती करणे गरजेचे आहे.

Health
Onion Seed Production : उत्तम बीजोत्पादन, यांत्रिक प्रतवारीद्वारे दर्जेदार कांदा बी निर्मिती

बालकामधील न्यूमोनियाविरुद्ध लढा देण्यासाठी जागतिक स्तरावर एक प्रयत्न म्हणून १२ नोव्हेंबर २००९ रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता. या दिवशी न्यूमोनियाशी संबंधित विविध कार्यक्रम आणि उपक्रम संपूर्ण जगभर साजरे केले जातात. साधारणपणे पाच वर्षांपर्यंतची लहान मुले आणि ६५ वर्षांच्या वरच्या व्यक्तींनाही न्यूमोनिया होऊ शकतो. पाच वर्षांच्या आतील बालकांमध्ये न्यूमोनियापासून संरक्षणासाठी लसीकरण हा चांगला उपाय आहे.

न्यूमोनिया म्हणजे काय

न्यूमोनियाच्या आजारात फुफ्फुसामध्ये संक्रमण अथवा फुफ्फुसांमध्ये कफ होतो. न्यूमोनियामुळे फुफ्फुसांमध्ये शुद्ध हवेचा प्रवाह येण्यात अडथळा येतो. त्यामुळे शरीरामधील ऑक्सिजनची पातळी कमी होते.

न्यूमोनियाची कारणे आणि प्रकार

न्यूमोनियाचे तीन प्रकार आहेत. जिवाणूजन्य-बॅक्टेरियल न्यूमोनिया, विषाणूजन्य - व्हायरल न्यूमोनिया आणि मायकोप्लाझमा न्यूमोनिया. न्यूमोनिया या आजारात प्रामुख्याने फुफ्फुसाला सूज येते. काही वेळा फुफ्फुसात पाणीही भरले जाते. योग्य वेळीच लक्षणे पाहून उपचार करणे आवश्यक असते. प्रामुख्याने बॅक्टेरिया, व्हायरस किंवा इतरही अनेक कारणांमुळे हा आजार होतो.

न्यूमोनियाची लक्षणे

न्यूमोनिया आजारात श्‍वास घेताना त्रास होणे, श्‍वास घेताना किंवा खोकताना छातीत दुखणे, वारंवार खोकला येणे, सतत जास्त ताप असणे, थरथरणे किंवा थंडी वाजणे, घाम येणे यासारखी सामान्य लक्षणे दिसून येतात.

यासोबत खोकल्यातून बेडका पडतो. न्यूमोनिया रुग्ण हा खूप अशक्त आणि थकलेला दिसतो. रुग्णाला श्‍वास घेताना प्रचंड त्रास होत असतो. तो वेगाने श्‍वास घेऊ लागतो. त्यामुळे घसा कोरडा पडून खोकला सुरू होतो. हे चक्र कायम चालू राहते. प्रचंड डोकेदुखी आणि अस्वस्थताही जाणवते.

मायकोप्लाझमा न्यूमोनियाची लक्षणे

जिवाणूजन्य आणि विषाणूजन्य न्यूमोनियापेक्षा मायकोप्लाझमा न्यूमोनियाची लक्षणे वेगळी दिसून येतात. याला चालता फिरता न्यूमोनिया असे देखील म्हणतात. घसा खवखवण्यापासून झालेल्या लक्षणांचा प्रारंभ दीर्घकाळ चाललेल्या खोकल्यामध्ये होतो. मायकोप्लाझमा न्यूमोनिया तीव्र आणि दीर्घकाळ राहतो. यामध्ये घसा खवखवण्यासोबत अधून मधून खोकल्याची मोठी उबळ येणे, पांढऱ्या रंगाचा कफ थुंकीवाटे बाहेर पडणे, बहुतांश वेळा कफाचे प्रमाण कमी असते, हुडहुडी भरून थंडी वाजणे आणि मळमळ किंवा उलट्या यासारखी लक्षणे दिसतात.

Health
Indian Farmer : कष्टाळू शेतकरी देशाचा हिरो

न्यूमोनियामध्ये करावयाच्या तपासण्या

रुग्ण तपासणी आणि लक्षणे पाहून न्यूमोनिया आजाराची प्राथमिक निश्‍चितता करता येते. यासोबत छातीचा एक्स रे, सिटी स्कॅन, रक्ताची तपासणी, बेडक्याची तपासणी याद्वारे न्यूमोनिया आजाराची निश्‍चिती करता येते. फुफ्फुसाचा किंवा श्‍वसनाचा आजार असणारे, लहान मुले, गर्भवती स्त्रिया, वृद्ध व्यक्ती आणि प्रतिकारशक्ती कमकुवत असणारे सर्व वयोगटातील यांना न्यूमोनिया होण्याचा धोका सर्वाधिक असतो.

उपचार

न्यूमोनियाची कोणतीही लक्षणे दिसल्यानंतर लगेच वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. आयुर्वेदामधील वमन, विरेचन, नस्य हे पंचकर्म फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कफ सुटण्यासाठी मीठ आणि तेल एकत्र करून छातीवर आणि पाठीवर चोळावे. सुंठ आणि दूध एकत्र करून घ्यावे.

Health
Crop Insurance : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू

आहार

पचण्यास हलका आणि ताजा आहार घ्यावा. हुलगे, मूग, मसूर, तूर यासोबत पालेभाज्या आणि फळभाज्या वांगे, तोंडली, पडवळ यांचा आहारात समावेश करावा. मसाल्यामधील लसून, हळद, सूंठ, वेलची याचा देखील समावेश करावा.

टाळावयाचा आहार

रुक्ष पदार्थ, तेलकट - तळलेले पदार्थ, आंबट फळे, दही, ताक, रात्री उशिरा जेवण, लोणचे, पापड, मासे, शीतपेय याचा आहारात समावेश टाळावा. तंबाखू, सिगारेट अशी व्यसने टाळावीत.

विहार

प्राणायाम, चालणे हा व्यायाम करावा. धूळ आणि धुळीच्या वातावरणात काम करणे टाळावे.

घ्यावयाची काळजी

लहान मुलांमध्ये न्यूमोनियाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण हाच एक सुरक्षित उपाय आहे. त्याशिवाय नवजात बालकांना पहिल्या सहा महिन्यांपर्यंत मातेने स्तन्यपान देणे, लहान मुलांच्या संपर्कात धूम्रपान टाळणे, तसेच मुलांना पोषक आहारासह प्रदूषण नसलेल्या मोकळ्या हवेत नेणे, याद्वारेही बालकांना होणारा न्यूमोनिया टाळण्यासाठी मदत होऊ शकते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com