Dry Port Survey : ‘ड्राय पोर्ट’साठी मजलेसह सावर्डे, नरंदेची पाहणी

राज्यात होऊ घातलेल्या पाच ड्राय पोर्टपैकी एक हातकणंगलेमध्ये होणार आहे.
Dry Port Survey
Dry Port Survey Agrowon

Kolhapur News : ‘ड्राय पोर्ट’ उभारणीच्या (Dry Port) कार्यवाहीला गती मिळाली असून, विभागीय अधिकारी मधुकर व्हाटोरे यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने शनिवारी (ता. २५) तालुक्यातील मजले, सावर्डे व नरंदे येथील जागांची पाहणी केली.

त्यासाठी आवश्यक असणारी दळणवळणांची (Transportation) साधने, रेल्वे मार्ग आणि इतर आनुषंगिक बाबींचा आढावा घेण्यात आला. त्याचा अहवाल केंद्र सरकारकडे (Central Government) पाठवला जाणार आहे. त्यानंतर पुढील कामाला गती मिळण्याची चिन्हे आहेत.

केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी महिन्याभरापूर्वी एका कार्यक्रमात हातकणंगले तालुक्यात ड्राय पोर्ट उभारण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या कामाला तत्काळ सुरुवात झाली आहे.

Dry Port Survey
Nitin Gadkari : नाशिकला आयात-निर्यात क्षेत्रात अग्रगण्य करणार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

या वेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले, ‘‘राज्यात होऊ घातलेल्या पाच ड्राय पोर्टपैकी एक हातकणंगलेमध्ये होणार आहे. प्रस्तावित ड्राय पोर्टमुळे जिल्ह्यात विकासाचे नवे पर्व सुरू होईल. दळणवळण, औद्योगीकरणात वाढ होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि कोकणातील कारखानदारी, शेती, फौंड्री, वस्त्रोद्योग, फळे, भाजीपाला, साखर कारखानदारीला नवी दिशा मिळेल आणि परिसराचा कायापालट होईल.’’

आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, ‘‘पंतप्रधान मोदींच्या धोरणानुसार गतिकृती योजनेंतर्गत एक खिडकी योजनेतून ड्राय पोर्टच्या कामाला गती मिळेल.

सोयीसुविधांच्या अभावांमुळे निर्यातीवर मर्यादा येत आहेत. ड्राय पोर्टच्या उभारणीमुळे तो प्रश्‍न निकाली निघून जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com