Seedless kinno Orchard : डोणगावमध्ये सीडलेस किन्नो बागेची संशोधन संचालकांकडून पाहणी

प्रामुख्याने पंजाब कृषी विद्यापीठाचे संशोधन असलेल्या सीडलेस किन्नो या संत्रा वाणाची लागवड लक्ष्यवेधी ठरत आहे.
Seedless kinno Orchard
Seedless kinno Orchard Agrowon

Akola News : डोणगाव येथील प्रयोगशील शेतकरी तथा उद्यानपंडित जगदेवराव आखाडे यांनी सीडलेस किन्नो संत्रा वाणाची लागवड केली असून या बागेची परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. डी. पी. वासकर यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राचे डॉ. संजय पाटील, कडधान्य पैदासकार डॉ. दीपक पाटील, प्रगतशील शेतकरी राजेश पळसकर, सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी मधुकरराव काळे, कृषी पर्यवेक्षक विठ्ठल धांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Seedless kinno Orchard
Crop Bharpai : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शेतकरी अडचणीत; पंचनाम्याबाबत विरोधीपक्षाची तक्रार

श्री. आखाडे हे फलोत्पादन क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग करीत असतात. संत्रा, आंबा, कांदा उत्पादनासाठी त्यांची ओळख सर्वदूर पोचलेली आहे. त्यांनी संत्र्याच्या विविध वाणांची लागवड केली.

प्रामुख्याने पंजाब कृषी विद्यापीठाचे संशोधन असलेल्या सीडलेस किन्नो या संत्रा वाणाची लागवड लक्ष्यवेधी ठरत आहे.

संत्र्याच्या विविध वाणांची आखाडे यांनी लागवड केली आहे. त्यांच्या या संग्रहाची पाहणी केली. पंजाब कृषी विद्यापीठाच्या टीएयु-१ या सीडलेस किन्नो संत्रा वाणाचे गुणधर्म जाणून घेतले. बागेत लागलेल्या फळांची गुणवत्ता, आकारमान, बाजारपेठेत असलेली मागणी पाहून समाधान वाटले. पारंपारिक पिकांपेक्षा अशाप्रकारचे वेगळे फलोत्पादन निश्चितच शेतकऱ्यांसाठी आज गरजेचे झालेले आहे.
डॉ. डी. पी. वासकर, संशोधन संचालक, परभणी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com