कृषी पुरस्कार निवड प्रक्रियेत अनियमितता

विभागीय समितीने सूचनांचे पालन न करताच कार्यालयात बसूनच प्रस्ताव हाताळले. हितसंबंध असलेल्या व्यक्‍तींचे प्रस्ताव योग्य ठरवून इतरांचे सोईस्करपणे फेटाळण्यात आले. त्यासाठी कागदपत्रांवर समितीमधील इतर सदस्यांच्या नुसत्या सह्या घेण्यात आल्या, असा आरोप मेटकर यांनी केला आहे.
Agriculture Awards
Agriculture AwardsAgrowon

अमरावतीः कृषी पुरस्कार निवड प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप अंजनगावबारी (जि. अमरावती) येथील रवींद्र मेटकर या शेतकऱ्याने केला आहे. विभागीय कृषी सहसंचालकांना या संदर्भाने निवेदन देत दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी केला आहे. निवेदनानुसार, मेटकर यांनी कृषी पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल केला होता. परंतु कोणत्याही सबळ कारणाशिवाय हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

विभागीय समितीने शेतकऱ्यांच्या प्राप्त प्रस्तावांची छाननी करून समक्ष भेट द्यावी, अशा मार्गदर्शक सूचना आहेत. विभागीय समितीने मात्र या सूचनांचे पालन न करताच कार्यालयाच्या वातानुकूलित कक्षात बसूनच प्रस्ताव हाताळले. हित संबंध असलेल्या व्यक्‍तींचे प्रस्ताव योग्य ठरवून इतरांचे सोईस्करपणे फेटाळण्यात आले. त्यासाठी कागदपत्रांवर समितीमधील इतर सदस्यांच्या नुसत्या सह्या घेण्यात आल्या, असा आरोप मेटकर यांनी केला आहे.

समितीच्या सदस्य सचिवांचा कार्यकाळ सातत्याने वादग्रस्त राहिला आहे. त्यांची खाते अंतर्गत विभागीय तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे असे अधिकारी शेतकऱ्यांप्रती प्रामाणिक राहणे शक्‍यच नाही. अशा अधिकाऱ्याकडे पुरस्कार निवड समितीचे सदस्य सचिव पद आहे. त्यासोबतच विभागीय कृषी अधीक्षकाचाही प्रभार सोपविण्यात आला आहे. या प्रकरणातील तथ्य जाणून घेण्यासाठी पुरस्कार निवड समितीला सोबत घेऊन प्रस्ताव दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतांना भेट द्यावी व पाहणी करावी. त्याआधारे नंतर गुणांकन करावे, असेही मेटकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

पुरस्कारार्थ्यांवर कोणताही गुन्हा नसावा, असा निकष आहे. त्यासाठी पोलिस विभागाकडून चारित्र्य पडताळणी केली जाते. रवींद्र मेटकर यांच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्यांचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. त्यांचा मुलगा शिवराजचा देखील पुरस्कारासाठी प्रस्ताव आहे. परंतु तो बारामती येथे शिक्षण घेत आहे. त्यामुळे बोनाफाइड विद्यार्थ्याला पुरस्कार कसा द्यायचा, हा प्रश्‍न आहे. परिणामी त्यांची तक्रार तथ्यहीन आहे.

किसन मुळे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com