International Tea Day: चहा इंग्रजांनी भारतात आणला, ही गोष्ट खोटी...

काल म्हणजे १५ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा करण्यात आला. आपल्याकडे अनेकांची आजही अशी समजूत आहे की, भारतात चहा ब्रिटिशांनी आणला. पण वस्तुस्थिती वेगळी आहे.
Maniram Dewan
Maniram DewanAgrowon

चीनमधून चहाच्या बिया (Tea Seed) आणून भारतात त्यांची लागवड (Tea Cultivation) करण्याचे प्रयत्न केले लॉर्ड बेंटिंकने. पण ती रोपं जगली नाहीत. या सुमारास मणिराम देवान (Maniram Dewan) या आसामच्या राजाच्या दिवाणाने चहाच्या शोधामध्ये रस घेतला. सिंगफो जमातीमध्ये चहाच्या पानांचा काढा (Tea Jiuce) पिण्याची रीत होती. मणिराम दिवाणने ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेऊन सिंगफो जमातीच्या गावांना भेटी दिल्या. तो काढा चहाच्या पानांचा आहे असा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला. भारतीय चहाचा शोध असा लागला.

Maniram Dewan
Citronella : सुगंधी औषधी गवती चहा

चहाच्या लागवडीसाठी हजारो एकर जमिनीवरील जंगल कापण्यात आलं. चहावर प्रक्रिया करण्याची यंत्रं इंग्लडहून कोलकत्याला यायची. तिथून आसामात. या व्यापारात मारवाडी व्यापाऱ्यांनी आघाडी घेतली. कारण चहाच्या लागवडीसोबत मळे कामगार आले. आसामच्या अर्थव्यवस्थेची वाढ होऊ लागली. हा व्यापार मारवाड्यांच्या हाती गेला. चहामळ्यातले कामगार बाहेरून आले. त्यांच्या अन्नाची गरज भागवायला हजारो एकर जमीन शेतीखाली आणण्यात आली. हे शेतकरी बंगालातून आले.

Maniram Dewan
Nagnathanna Naikwadi : वेटरला जवळ बसवून चहा पाजणारे नागनाथअण्णा!

आजच्या आसाम प्रश्नांची मूळं चहाच्या लागवडीत आणि आसामच्या विकासात आहेत. आतले आणि बाहेरचे हा प्रश्न तेव्हापासून गुंतागुंतीचा बनला. मणिराम दिवाण आसामच्या राजांचा दरबारी होता. म्यानमारमधील आक्रमकांपासून आसामचा बचाव करण्यासाठी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची मदत घ्यावी, असं त्याचं मत होतं. मणिराम दिवाण उद्यमशील होता. चहाचे मळे लावणारा तो पहिला भारतीय. बाकीचे मळेवाले ब्रिटीश होते. ते त्याला हिणवत. बरोबरीचा मानत नसत.

हळूहळू ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी भारताचं शोषण करण्याकरता आली आहे असं त्याचं मत बनलं. म्हणून त्याने १८५७ च्या बंडात भाग घेतला. त्याने आसाममध्ये सशस्त्र उठाव करण्याच्या हालचाली सुरू केल्या. तो पोलिसांच्या हाती लागला. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

मणिराम दिवाणला फासावर लटकवण्यात आलं, त्या दिवशी चहामळ्याच्या कामगारांनी उत्स्फूर्तपणे संप केला. आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त मणिराम दिवाणचं स्मरण करणं उचित ठरेल. कारण त्याचा संबंध भारतीय उद्यमशीलतेशी, वसाहतवादाच्या विरोधातील लढ्याशी आणि स्वातंत्र्य प्रेरणेशी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com