Godavari River Pollution : ‘गोदावरी’ प्रदूषणमुक्तीसाठी सातत्याने काम करणे आवश्यक

River Pollution : नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीचा उगम असून नदीचे प्रदूषण होऊ न देता तिचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे.
River Pollution
River Pollution Agrowon

Nashik Godavari River : नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीचा उगम असून नदीचे प्रदूषण होऊ न देता तिचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे.

गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सातत्याने काम करणे आवश्यक असून नदीकाठावरील प्रत्येक गावाने सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करून सांडपाण्याचा एकही थेंब नदीत जाणार नाही यासाठी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन विभागीय आयुकत राधाकृष्ण गमे यांनी केले.

स्वच्छ भारत अभियान (ग्रा) जिल्हा परिषद नाशिकअंतर्गत मंगळवारी (ता. २) नाशिक तालुक्यातील लाखलगाव येथे गोदावरी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या वेळी विभागीय आयुक्त गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरावरील खातेप्रमुख उपस्थित होते.

River Pollution
World Water Day : लोक सहभागातून नदी प्रदूषणावर मात करणारा गोदावरी नदी संसंद उपक्रम

ते म्हणाले, की गोदावरी नदी स्वच्छता हे एका दिवसाचे काम नसून या कामात सातत्य गरजेचे आहे. नाशिक महानगरपालिका, ग्रामीण भागातील गोदाकाठावरील सर्व गाव यांनी गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नियोजनपूर्वक काम करण्याची आवश्यकता आहे.

ग्रामीण भागातील नदी काठावरील सर्व गावांनी सांडपाणी व घनकचऱ्याच्या उपाययोजना कराव्यात, प्लॅस्टिकचे योग्य व्यवस्थापन करावे व गोदावरी नदी प्रदूषित होणार नाही यासाठी जनजागृती करावी, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात १ ते ४ मे या कालावधीत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

याअंतर्गत १ मे रोजी कार्यालय स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तर जिल्ह्यात ठिकठिकाणी एकाचवेळी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. निफाड तालुक्यात चांदोरी येथे नदीकाठाची स्वच्छता करण्यात आली. लाखलगाव येथे गोदावरीतून पानवेली काढण्यात आल्या तसेच काठाची स्वच्छता करण्यात आली.

या मोहिमेसाठी मित्तल यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com