Salam Kisan: ९० सेंकंदात माती परीक्षण करणे शक्य होणार

शेत जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी माती परीक्षण ही एक महत्वाची प्रक्रिया आहे. माती परीक्षणामुळे जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे, ते लक्षात येते आणि त्यावर उपाय करता येतात
Salam Kisan
Salam KisanAgrowon

शेत जमिनीचे आरोग्य (Soil Health) चांगले ठेवण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी (Agriculture Productivity) माती परीक्षण (Soil Test) ही एक महत्वाची प्रक्रिया आहे. माती परीक्षणामुळे जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता (Nutrition Deficiency) आहे, ते लक्षात येते आणि त्यावर उपाय करता येतात. परंतु आजच्या घडीला शेतकऱ्यांचा माती परीक्षणाला फारसा प्रतिसाद मिळत नाही.

Salam Kisan
Soil Testing : कृषिदूतांकडून माती परिक्षणाविषयी प्रात्याक्षिक

त्याची अनेक कारणे आहेत. त्यातील एक म्हणजे किचकट प्रक्रिया. माती परीक्षणासाठी एक किलो माती प्रयोगशाळेमध्ये घेऊन जाण्याचा आटापिटा करायचा आणि मग काही दिवसांनी त्याचा रिपोर्ट येणार, त्यानुसार मग सल्ला आणि अंमलबजावणी अशी संपूर्ण प्रक्रिया असते. पण त्याला छेद देत `सलाम किसान`ने शेतकऱ्यांना अत्यंत सोयीची सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे.

त्यासाठी आयआयटी, कानपूर ने विकसित केलेले पोर्टेबल माती परीक्षण किट वापरले जाणार आहे. त्यामुळे आता दहा ग्रॅम मातीचा नमुना घेऊन मोबाईलच्या मदतीने केवळ ९० सेकंदांमध्ये मातीचे आरोग्य जाणून घेता येणार आहे.

Salam Kisan
Soil Test : उत्पादन वाढीसाठी माती परीक्षण काळाची गरज

कमी वेळेत शेताच्या बांधावर अचूक परीक्षण

सध्याच्या पध्दतीत माती परीक्षणासाठी साधारणपणे एक किलो माती नमुना प्रयोगशाळेमध्ये नेऊन द्यावा लागतो. त्याचे निष्कर्ष मिळण्यासाठी दोन ते सात दिवस लागू शकतात. यामध्ये शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्च, वेळ आणि पैसा खर्च होतो. `सलाम किसान`च्या या नवीन सुविधेमुळे या अडथळ्यावर मात करता येऊ शकते.

Salam Kisan
Soil Testing : 'यू टर्न" घेऊन एकाएकी शेतकरी कसा झालो ?

९० सेकंदात माती परीक्षण कसे शक्य झाले?

परीक्षणाचा निष्कर्ष त्वरित मोबाईलवर प्राप्त होण्यासाठी ‘भू परीक्षक’ किंवा सलाम किसान या मोबाईल ॲप द्वारे केवळ दहा ग्रॅम माती नमुना ३०० ग्रॅम वजनाच्या ठोकळ्या सारख्या दिसणाऱ्या उपकरणामध्ये टाकायचा. त्यानंतर हे उपकरण ब्ल्यूटूथद्वारे मोबाईलशी जोडायचे. जर ब्ल्यूटूथ चालू असेल, तर ते आपोआप जोडले जाते. ही प्रक्रिया ९० सेकंदांमध्ये पार पडते. त्यानंतर मोबाईलच्या स्क्रीनवर भू-परीक्षक व सलाम किसान या विशेष तयार केलेल्या अॅपमध्ये मातीच्या आरोग्याचा अहवाल एकमेव अशा आयडी क्रमांकासह त्वरित उपलब्ध होतो.

अहवालात कोणत्या घटकांचा समावेश?

या उपकरणामुळे मातीतील नत्र, स्फुरद, पालाश, सेंद्रिय कर्ब यांसह सहा घटकांचे प्रमाण समजू शकते. पिकाचा उल्लेख केलेला असल्यास त्या पिकासाठी शिफारशित खतमात्रा आणि परीक्षणानुसार करायचे बदल यानुसार आपल्या शेतासाठीच्या खत शिफारशी सुचविल्या जातात. त्यानुसार पिकांचे खत व्यवस्थापन केल्यास पिकाच्या उत्पादन वाढीसाठी फायदा होऊ शकतो. सलाम किसान हे अॅप अजून बाजारात आले नसले तरी मातीच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून लवकरच सर्वसामान्य शेतकऱ्यांना सलाम किसान ॲप वापरता येणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com