‘आयटीसी’ ९० गावांत घेणार महिलांच्या शेतीशाळा

सोयाबीन पिकाच्या बदलत्या हवामानावर आधारित; गावात निवडलेल्या सुपर चॅम्पियन शेतकऱ्यांच्या डेमो प्लॉटवर पेरणीपासून ते काढणीपर्यंत चे मार्गदर्शन केल्या जाणार आहे.
Farm Workshop
Farm WorkshopAgrowon

अमरावती : आयटीसी ‘मिशन सुनहरा कल’अंतर्गत ‘बायफ’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खडेश्‍वर, भातकुली व अमरावती तालुक्यांतील निवडक गावामध्ये ‘क्लायमेट स्मार्ट शेती कार्यक्रम’ राबविला जात आहे. त्याअंतर्गत नव्वद गावांत महिलांच्या शेतीशाळा घेतल्या जाणार आहेत.

या प्रकल्पाच्या अंतर्गत निवडलेल्या गावाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी विविध घटकांची अंमलबजावणी केल्या जात असून प्रामुख्याने महिला बचत गटाच्या उपजीविकेसाठी निवडक बचत गटाला ‘कृषी अवजार बँकेचे’ व्यावसायिक प्रशिक्षण देऊन व काही समूहांना कृषी अवजार उपलब्ध करून देऊन त्यातून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे करण्यात आयटीसी मिशन सुनहरा कल व बायफ यंत्रनेचा मोठा वाटा आहे.

त्यासोबतच बचत गटाला जोडून ॲग्री बिझनेस सेंटर च्या माध्यमातून बियाणे बँक, जैविक खत व औषधी, कृषीवर आधारित लघू उद्योग उभे करणे व त्यांना प्रशिक्षण देऊन सविस्तर मार्गदर्शन सुद्धा केल्या जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील विविध बचत गटाला कृषी अवजार बँक केंद्राचे प्रशिक्षण दिले असून, त्यामधून ७२ कृषी अवजार बँक केंद्र भक्कमपणे सुरू झालेली आहेत व आज त्या महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार देत आहेत.

यावर्षी भातकुली, नांदगाव व अमरावती तालुक्यात निवडक गावात शेती व महिला शेतकरी या बाबीला केंद्रीभूत करून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित खरीप हंगामात ‘महिला शेतकऱ्यांच्या शेतीशाळा’ अमरावती जिल्ह्यातील ९० गावांत राबविल्या जाणार आहेत. सोयाबीन पिकाच्या बदलत्या हवामानावर आधारित; गावात निवडलेल्या सुपर चॅम्पियन शेतकऱ्यांच्या डेमो प्लॉटवर पेरणीपासून ते काढणीपर्यंत चे मार्गदर्शन केल्या जाणार आहे.

त्यासोबतच सोयाबीन पिकाचे भरघोस उत्पादनासाठी उत्तम गुणवत्तेचे बियाणे, बीबीएफ-रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी पद्धत; जिल्ह्यात पहिल्यांदा आयटीसी प्रकल्पाने सुरुवात केलेली होती व आज त्या तालुक्यातील ७५ टक्के शेतकरी बीबीएफ पद्धतीने पेरणी करीत आहेत व प्रतिसाद सुद्धा वाढत आहे. त्या पलीकडे जाऊन उत्पादन मालाला मार्केटमध्ये चांगला भाव मिळवून देऊन; बियाणे बँक सुद्धा आज गावागावांत प्रकल्पाच्या माध्यमातून उभ्या झाल्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com