सर्पाचिया अंगा मृदुपण खोटे...

अवतीभवती चार जोडलेली माणसे असणं कधीही चांगलंच. पण ती नसली तरीही मनाचा तोल ढळू नये. कुठलाही खड्डा पडू नये. इतकं स्वतःला सावरता यायला हवंच. आपलं सुख दुसऱ्याच्या दावणीला बांधू नये कधीच!
माणसे
माणसेagrowon

स्वतःला रोज एक एक पायरी वरती नेणं, स्वतःशीच स्पर्धा करणं ही एक आनंददायी प्रक्रिया (Pleasant process)आहे. स्वतःचीच सोबत करणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे. अवतीभवती चार जोडलेली माणसे असणं कधीही चांगलंच. पण ती नसली तरीही मनाचा तोल ढळू नये. कुठलाही खड्डा पडू नये. इतकं स्वतःला सावरता यायला हवंच. आपलं सुख दुसऱ्याच्या दावणीला बांधू नये कधीच! त्यापेक्षा आपण काल जे होतो, त्यापेक्षा आज अजून चांगलं नि परवा सर्वांत चांगलं, असा उत्तमाचा ध्यास लागायला हवा. कमतरता असतात प्रत्येकात पण काही तरी विशेष ही नक्कीच असते. प्रत्येक व्यक्ती एकमेवाद्वितीय अशी निर्मिकाची कलाकृती असते. उगाच कावळ्याने पोपट होण्याचा नि पोपटाने मोर होण्याचा प्रयत्न करू नये. कुणाही सोबत तुलना करणे केवळ दुःखच देते.

आज जरी कुणी आपल्याला लौकिकार्थाने यशस्वी (Success)दिसत असेल तरीही त्याच्या आयुष्यात एखादा असा दुखरा कोपरा असतो, की तो सर्वांसमोर खुला करता येत नाही. काही दुःख चुनकाट्यासारखी आकाराने अगदी नगण्य पण सलत राहतात, पावलागणिक! पण थांबता येत नाही. त्या दुखऱ्या पायासहित चालायचं आणि तरीही चेहऱ्यावर जराही कळ उमटू द्यायची नाही, हा अभिनय शारीरमानसिक पातळीवर दुहेरी दमवणूक करतो. अगदी सहज, नैसर्गिक वागता यावं. कुणाच्या प्रभावाने दबून किंवा भारावून जाता कामा नये. कुणावरही आपला प्रभाव
पाडण्याची गरज उरू नये. ना कुणाच्या स्तुतीने उमलावे ना निंदेने स्वतःला आकसून घ्यावे. कौतुक माणसाला जितकं वर घेऊन जाते तितक्याच वरून खाली कडेलोटही करते. म्हणून जमिनीवर असावं. मखरात बसलं म्हणजे विसर्जन आलंच.

माणसे
रयतु भरोसा केंद्राच्या कामाची संयुक्त राष्ट्रांकडून दाखल

सापाच्या अंगी मृदुपण असते पण ते घातकच! तंटे मृदुत्व अनुभवायचं तर डंख सोसायची तयारी हवी. वाहून जाऊ नये बोलण्याच्या गोड प्रवाहात. आपला काठ धरून ठेवता यायला हवा. कुठलीच नाती जन्माला पुरत नसतात. अथांग सागरात दोन ओंडके योगायोगानेच भेटतात, विलग होतात, ज्याचा त्याचा मार्ग वेगळा, दिशा वेगळी, गंतव्य स्थान वेगळं. वाट्याला आलेलं जगणं सुंदर असेलच असे नाही, पण ते सुंदर करण्याची इच्छा कुणी हिरावून घेऊ शकत नाही. इच्छेला मार्ग असतात. घनगर्द अंधारात चाचपडणे अपरिहार्य असते तेव्हा एखादी पणती आधी मनात तर पेटायला हवी. उजेडाची स्वप्नं नुसतीच बघायची नसतात. जगायचीही असतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com